For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका रक्तगटाला मधुमेहाचा 28 टक्के अधिक धोका

06:52 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
एका रक्तगटाला मधुमेहाचा 28 टक्के अधिक धोका
Advertisement

भले मग रक्तगट पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह

Advertisement

मधुमेहाचा धोका वाढण्याचा मुद्दा येताच सर्वसाधारणपणे आहार, स्थुलत्व आणि खराब लाइफस्टाइलची चर्चा होते. परंतु जर तुमचा रक्तगट देखील याकरता जबाबदार असल्याचे कळल्यावर तुम्ही चकित व्हाल. एका नव्या अध्ययनात बी ब्लडग्रूप असलेल्या लोकांमध्ये टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका अन्य रक्तगटांच्या तुलनेत सुमारे 28 टक्के अधिक असू शकतो असा दावा करण्यात आला आहे. संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष हजारो लोकांशी निगडित आकडेवारीच्या तपासणीनंतर काढण्यात आल्याचे सांगितले आहे.

नव्या अध्ययनात बी ब्लडग्रूप आणि टाइप-2 मधुमेहादरम्यान एक कनेक्शन दिसून आले. संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी पूर्वी पार पडलेल्या 51 अध्ययनांची आकडेवारी पाहिली आणि त्यांची तुलना केली. अध्ययनात बी ग्रूप असलेल्या लोकांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका अन्य रक्तगट असलेल्या लोकांच्या तुलनेत सुमारे 28 टक्के अधिक असू शकतो असे दिसून आले.

Advertisement

ही माहिती 6870 लोकांशी निगडित आकडेवारीवर आधारित आहे. हा निष्कर्ष अशा सर्व आरोग्यसंबंधी कनेक्शन्समध्ये सर्वात मजबूत आढळून आला, ज्याची तपासणी या संशोधनांमध्ये करण्यात आली होती. परंतु बी ब्लडग्रूप असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मधुमेह होईलच असा याचा अर्थ नाही. हा केवळ वाढलेल्या धोक्याकडे लक्ष वेधून घेते.

चिंता करावी का?

केवळ बी ब्ल्डग्रूप असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. मधुमेह होण्यामागे अन्य इतर कारणेही जबाबदार असतात. अधिक वजन, कमी चालणेफिरणे, खराब आहार आणि परिवारात पूर्वीपासून मधुमेह असणे आजही या आजाराची सर्वात मोठी कारणे मानण्यात येतात. अशास्थितीत रक्तगटाला केवळ एक संकेत म्हणून पाहिले जात आहे.

अखेर यामागील कारण काय?

बी ब्लडग्रूप असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक का दिसत आहे हे वैज्ञानिक  अद्याप शोधू शकलेले नाहीत. काही नव्या अध्ययनांमध्ये आतड्यांमधील बॅक्टेरिया म्हणजेच गट मायक्रोबायोम यात भूमिका बजावू शकतात असे संकेत मिळाले आहेत. या कनेक्शनला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. तर या अध्ययनातून ब्लडग्रूप आणि मधुमेहादरम्यान कुठलाही संबंध असू शकतो हे अवश्य कळते. वैज्ञानिक या कनेक्शनला चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी पुढील संशोधनकरत आहेत. ब्लडग्रूप बदलले जाऊ शकत नाही, परंतु जीवनशैलीत बदल करत मधुमेहाच्या धोक्याला मोठ्या प्रमाणात कमी केले जाऊ शकते असे संशोधकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.