For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वाहन चोरीप्रकरणी एकास अटक

11:05 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहन चोरीप्रकरणी एकास अटक

विजापूर पोलिसांची कारवाई : 15 लाख रुपयांची तीन वाहने जप्त

Advertisement

वार्ताहर /विजापूर

शहरातील वाहनांच्या चोरीप्रकरणी एकाला अटक करून त्यांच्याकडून  15 लाख किंमतीच्या 3 कार जप्त करण्यात आल्या आहेत. यासीन मोहम्मदसीन सरदार पटेल (वय 24, रा. इब्राहिमपूर, रेल्वे स्थानकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती एसपी ऋषिकेश सोनवणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील वाढत्या वाहनांच्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी तपास पथकाची स्थापना केली होती. बुधवारी सकाळी सिंदगी नाका येथे पथक गस्त घालत असताना अटक करण्यात आलेला आरोपी नंबर प्लेट नसलेल्या बोलेरोमधून जात होता. तपास पथकाची नजर त्याच्यावर पडताच तो वाहन वळवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पथकाने त्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

Advertisement

चोरीची कबुली

Advertisement

त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणून चौकशी केली असता पकडलेली बोलेरो त्यानेच चोरली होती. तसेच दीड महिन्यापूर्वी सिंदगी नाका येथे पार्क केलेली बोलेरो त्याने चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी इतर दोन वाहने चोरून घरासमोर उभी केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडील महिंद्रा टीयुव्ही ओ 300 आणि  एसडब्ल्यूटी डिझायर वाहन जप्त करण्यात आली आहेत. यापैकी एक वाहन गोलगुमट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तर, दुसरे वाहन जलनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आणि एसडब्ल्यूटी डिझायर वाहन परिसरातून चोरीला गेले होते. सदर तिन्ही वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमणगौडा हट्टी, शंकर मारिहाळ, डीएसपी बसवराज यलिगार, सीपीआय मल्लय्या मठपती, पीएसआय राजू पुजारी, पीएसआय सुषमा उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :
×

.