कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक विमानतळ...दोन देश

06:11 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलिकडच्या काळात विमान प्रवास ही चैन राहिली नसून आवश्यकता बनली आहे. लोक खूपच पर्यटनप्रेमी झाले आहेत. त्यामुळे विविध देशांना ते भेटी देत असतात. सहसा ते ज्या विमातळावर विमानाने उतरतात, तो एकाच देशातील असतो. याचा अर्थ असा की, ज्या देशातील विमानतळावर ते उतरतात त्याच देशात ते जाऊ शकतात. पण या जगात एक असा विमाततळ आहे, की ज्यावर उतरल्यानंतर प्रवासी दोन भिन्न भिन्न देशांना जाऊ शकतात. हा विमानतळ फ्रान्समध्ये असून त्याचे नाव बेसल-मलहाऊस-फ्रिबर्ग एअरपोर्ट असे आहे.

Advertisement

Advertisement

त्याची निर्मिती 1930 मध्येच झाली आहे. या विमानतळावर उतरल्यास प्रवासी एका द्वारातून बाहेर पडल्यास तो फ्रान्समध्ये पोहचतो. तर अन्य द्वारातून बाहेर पडल्यास तो स्विट्झर्लंडमध्ये असतो. या दोन्ही देशांची कस्टम कार्यालये या विमाततळावर आहेत. तसेच दोन्ही या दोन्ही देशांचे कायदेही वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या देशात जायचे आहे, याची प्रवाशाने जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या निवडीप्रमाणे त्याला बाहेर पडण्यासाठी दरवाजा निवडावा लागतो. दोन भिन्न भिन्न देशांमध्ये प्रवेश देणारा हा जगातील एकमेव विमानतळ आहे. त्यामुळे या विमातळाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article