For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसाव्या दिवशी कोठे काय...

06:05 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसाव्या दिवशी कोठे काय
Advertisement

इराणमध्ये...

Advertisement

ड अमेरिकेची दोन युद्धविमाने पाडल्याचा इराणचा दावा. रडार व्यवस्था सुरक्षित असल्याचाही दावा. अमेरिकेच्या विमानचालकाला पकडून देणाऱ्यास 60 हजार डॉलर्सचे पारितोषिक घोषित. इराणकडूनही या चालकाचा शोध घेण्यास प्रारंभ

ड इराणमध्ये 2 हजार 76 नागरीकांचा युद्धास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात मृत्यू. किमान 26 हजार लोक जखमी. मृतांमध्ये विद्यार्थी आणि बालकांचा समावेश. अधिकृत संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असणे शक्य.

Advertisement

आखाती देशांमध्ये...

ड अबुधाबीमध्ये इराणने केलेल्या गॅस स्टेशनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात एका इजिप्शियन नागरीकाचा मृत्यू. चार नागरीक जखमी. हे क्षेपणास्त्र अबुधाबीच्या संरक्षण व्यवस्थेने आकाशात नष्ट केले. त्याचा ढिगारा कोसळून हा नागरीक ठार.

ड कुवेतच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर आणि जलशुद्धीकरण केंद्रावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात या केंद्रांची हानी. इराणने जलशुद्धीकरण केंद्रावर हल्ला केल्याचा आरोप नाकारला. तथापि, या केंद्राची हानी झाल्याचे चित्रण प्रसिद्ध.

ड बहारीन येथे इराणच्या ड्रोन हल्ला. ड्रोन आकाशातच निकामी करण्यात आले. तथापि, त्याचे अवषेश कोसळून चार नागरीग जखमी, तसेच काही घरांची हानी. बहारीनवरचा हा युद्धास प्रारंभ झाल्यापासूनचा चौदावा हल्ला असल्याचे वृत्त

अमेरिकेत...

ड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या संसद सदस्यांकडे 1.5 लाख कोटी डॉलर्सच्या संरक्षण अर्थसंकल्पाला मान्यता देण्याची केली मागणी. ती मिळाल्यास अमेरिकेचा हा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा संरक्षण अर्थसंकल्प ठरणार.

ड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अमेरिकेची दोन युद्धविमाने पडल्याची देण्यात आली माहिती. इराणने ही विमाने पाडल्याचा केला आहे दावा. अमेरिकेकडून अद्याप दुजोरा नाही. इराणकडूनही चालकाचा शोध घेण्यास प्रारंभ.

इस्रायलमध्ये...

ड इराणकडून इस्रायलच्या नागेव्ह येथील औद्योगिक वसाहतीवर क्षेपणास्त्र हल्ला. वसाहतीत एका स्थानी लागली आग. मात्र, विशेष हानी न झाल्याचे वृत्त. या युद्धात इस्रायलमध्ये आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू आणि 1 हजार लोक जखमी.

ड इराण, गाझा आणि लेबेनॉन या तीन स्थानी युद्ध एकाचवेळी केल्याने इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर ताण. आतापर्यंत युद्धावर 112 अब्ज डॉलर्सचा खर्च. तसेच गेले कित्येक दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण विस्कळीत.

ड इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलच्या 78 टक्के ज्यू नागरीकांचे बेंजामिन नेतान्याहू यांना समर्थन. त्यामुळे नेतान्याहू यांना मोठाच दिलासा. हे समर्थन इस्रायलमधील निवडणुकीपर्यंत टिकेल काय, यावर इस्रायलमधील तज्ञांत मतभिन्नता.

लेबेनॉन आणि सीरीयामध्ये...

ड इस्रायलच्या विमान हल्ल्यात सीरीयामधील क्वेन्ट्रा भागात एका व्यक्तीचा मृत्यू. हा भाग इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान टेकड्यांच्या जवळ. सीरीयातील हिजबुल्लाच्या तळांवर इस्रायलचे आणखी हल्ले होण्याची शक्यता.

ड इस्रायलच्या हल्ल्यात लेबेनॉनमधील बेक्का क्षेत्रात दोन सेतू नष्ट. इस्रायलच्या सैनिकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागल्याचा हिजबुल्लाचा दावा. इस्रायलच्या तोफखान्यावरही हल्ला केल्याचा दावा. तथापी, दोन्ही दाव्यांची नाही स्वतंत्र पुष्टी.

Advertisement
Tags :

.