For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : रस्त्यावर कचरा टाकल्यास आता सांगलीत होणार ऑन द स्पॉट कारवाई

01:34 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   रस्त्यावर कचरा टाकल्यास आता सांगलीत होणार ऑन द स्पॉट कारवाई
Advertisement

                 सांगलीत स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Advertisement

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाऱ्याचा नागरिक आणि व्यावसायिकांवर आता महापालिकेने कठोर धोरण अवलंबले आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितावर ऑन द स्पॉट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून कारवाई आणि नामुष्की टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार विशेष भरारी पथक तयार केले आहे. हे पथक कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर चेट कारवाई करणार आहे. पथकाकडून संबंधित व्यक्तींचे फोटोशूट व व्हिहिजओ रेकॉडिंग केले जाणार आहे.

Advertisement

चित्रीकरणानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सार्वजनिक नामुष्की टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, कारण चित्रीकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जाणार आहेत. या पथकाचे मार्गदर्शन स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी व अतुल आठवले करत असून, त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक, भाग मुकायम व कर्मचारी कार्यरत आहेत प्रत्येक नागरिकाने आपला कचरा केवळ घंटागाडीमध्येच टाकावा अपार्टमेंटमधील नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र करून, तो काळ्या पिशवीत बांधावा.

नागरिकांना आवाहन

मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, 'शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करा दंडात्मक कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका,"

Advertisement
Tags :

.