For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला दिनानिमित्त लोकमान्य सोसायटीची ‘महिला उन्नती ठेव योजना’ सुरू

10:53 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला दिनानिमित्त लोकमान्य सोसायटीची ‘महिला उन्नती ठेव योजना’ सुरू
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून महिला दिनानिमित्त महिला उन्नती ठेव योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना 1 मार्च ते 31 मार्च 2024 पर्यंत कार्यान्वित असेल. या योजनेंतर्गत ठेवीदाराला 10 टक्के आकर्षक व्याज मिळेल. ठेवीची मुदत 500 दिवसांची आहे व किमान गुंतवणूक 10 हजार रुपये आहे. सभासद महिला जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. ज्येष्ठ नागरिक महिलांना अतिरिक्त अर्धा टक्का व्याज अधिक मिळेल. काही अटी व शर्तीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सोय आणि ठेव रकमेवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. 10 लाखांहून अधिक एकरकमी ठेव पावतीवरसुद्धा अधिक व्याज मिळणार आहे.

Advertisement

नवयुगात महिला केवळ गृहिणी नाहीत तर त्या स्वयंनिर्णय घेणाऱ्या आणि सर्व क्षेत्रात कर्तृत्व गाजवून अग्रेसर झाल्या आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य लोकमान्य सोसायटीने महिला सक्षमीकरणाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. म्हणूनच सोसायटीच्या 55 टक्के कर्मचारी या महिला आहेत व त्यापैकी अनेक त्यांच्या विभागांचे व शाखांचे नेतृत्व करतात. 213 शाखांचा विस्तार असणारी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीमध्ये कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या जवळच्या शाखेमध्ये संपर्क साधता येईल किंवा टोल फ्री क्रमांक 18002124050 वर माहिती मिळू शकेल. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सर्व क्षेत्रीय विभागातर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.