महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी शेअर बाजार मजबुतीसोबत बंद

06:49 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयटी कंपन्यांची चमक : सेन्सेक्स 443 अंकांनी वधारला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या आणि जुलैच्या पहिल्या दिवशी दमदार तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला. आयटी क्षेत्रातील कंपन्यांची बाजारात मजबूत कामगिरी दिसून आली असून सेन्सेक्स निर्देशांक 443 अंकांच्या वधारासह बंद झाला.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 443 अंकांनी वाढत 79,476 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 131 अंकांच्या वधारासह 24,141 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे तज्ञांच्या मते आगामी काळातही आयटी कंपन्यांचे समभाग तेजीकडे सरकताना दिसणार आहेत. टेक महिंद्रा आणि विप्रो या कंपन्यांचे समभाग बाजारात सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले.

शुक्रवारी शेअरबाजारात काहीशी नरमाई दिसून आली होती. त्यादिवशी घसरणीसोबत बाजार बंद झाला होता. पण सोमवारी पुन्हा बाजाराने तेजीकडे प्रयाण केले. ऑटो क्षेत्र, एफएमसीजी क्षेत्रात तेजी होती पण सार्वजनिक बँकांचा निर्देशांक व ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक मात्र काहीसे घसरणीसोबत व्यवहार करत होते. सुरुवातीच्या काही मिनीटात शेअरबाजारात काहीसा नकारात्मक कल होता. निफ्टी निर्देशांक 24 हजाराच्या खाली 23,993 अंकांवर खुला झाला होता. पण काही मिनीटांनंतर मात्र निफ्टी पुन्हा 24 हजाराच्या वर सरकला आणि हाच स्तर कायम राखला. बँकिंग समभागांमध्ये सुरुवातीच्या सत्रात घसरण होती. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग गुंतवणूकदारांनी खरेदी केले.

या कंपन्यांचे समभाग चमकले

टेक महिंद्राचे समभाग 2.92 टक्के, विप्रो 2.40 टक्के इतके वधारलेले होते. ग्रासिम इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article