महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शुक्रवारी 7 गाळ्यांना ठोकले टाळे

11:13 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : येथील महानगरपालिकेच्यावतीने बेकायदेशीररित्या कब्जा घेतलेल्या गाळेधारकांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे इतर बेकायदेशीर गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. मागील दोन दिवस शहरातील बेकायदेशीर गाळेधारकांवर कारवाईचा बडगा सुरू आहे. शुक्रवारी खासबाग आणि कोनवाळ गल्ली येथील मटण मार्केटमधील गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत. शहरात बेकायदेशीर गाळेधारकांची संख्या अधिक आहे. त्यांच्याविरोधात मनपाने मोहीम अधिक सक्रिय केली आहे. बुधवारी 6 गाळे तर गुरुवारी सीबीटीमधील 15 गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ शुक्रवारी खासबाग येथील 3 तर कोनवाळ गल्ली येथील 4 गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. शिवाय शहरात इतर ठिकाणी बेकायदेशीर गाळेधारक असल्याची माहिती मनपाकडे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

Advertisement

आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई

Advertisement

याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मागील दोन वर्षांपासून ही कारवाई थंडावली होती. मात्र महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. गाळ्यांचा लिलाव होऊनदेखील त्याचा ताबा महानगरपालिकेकडे देण्यात आला नव्हता. जुनेच भाडेकरू त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एकूण 7 गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली. महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, चंद्रू मुरारी, सुरेश आलूर यांनी ही कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article