For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satej Patil आजपासून 'ॲक्शन मोड'वर; गोकुळच्या रणसंग्रामासाठी मैदानात

12:23 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
satej patil आजपासून  ॲक्शन मोड वर  गोकुळच्या रणसंग्रामासाठी मैदानात
Advertisement

                     गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील ‘अॅक्शन मोड’मध्ये

Advertisement

कोल्हापुर- महायुतीतील अंतर्गत संघर्षांमुळे चेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत असलेले कॉग्रेसचे आमदार सतेज आज मंगळवारपासून 'अॅक्शन मोड वर येणार आहेत. त्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे प्रशासकांनी कार्यभार घेतला की लगेचच गोकुळच्या निवडणुकीबाबतची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट करणार आहेत. येईल त्याला सोबत घेऊन लढायचे डी टॅगलाईन घेऊनच ते मैदानात उतरणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी बलाढ्य महाडिकांकडून गोकुळची हंडी आपल्या हातात घेण्यात यश मिळवले, पारदर्शक कारभाराचा शब्द देऊन सत्ता हातात घेतल्यानंतर पाटील व मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळत गोकुळमधल्या महाडिक पेंटर्नला धक्का दिला. दोन रुपयांच्या दरवाढीचे आश्वासन तब्बल १८ रुपये वाढ देऊन पूर्णकेले.

Advertisement

कारभारात सुसूत्रता आणली. विरोधकांना नामोहरम केले. तथापि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर एकमेव विरोधी सदस्य असणाऱ्या शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून भाजपने पुन्हा एकदा चौकशींचा ससेमिरा मागे लावला. सत्ताधाऱ्यांच्या याचा सामना करतच पाच वर्षाचा कार्यकाल सोमवारी ४ मे रोजी पूर्ण केला खरा, पण महाडिकांनी टाकलेल्या शेवटच्या फास्यामध्ये अडकले आणि कार्यभार सोडताना प्रशासक येण्याची नामुष्की ओढवली गेली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement
Tags :

.