महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘पीडीपी’सोबत चर्चेसाठी ओमर अब्दुल्लांचा इन्कार

06:07 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (पीडीपी) जागावाटप बोलणी करण्यास असहमती दर्शवली. पत्रकार परिषदेत बोलताना ओमर यांनी जागावाटपासाठी पीडीपीशी तडजोड करणार नसल्याचे सांगितले. नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तीनही जागा स्वतंत्रपणे लढवेल आणि स्वबळावर जिंकेल, असा दावाही ओमर अब्दुल्ला यांनी केला.

Advertisement

नॅशनल कॉन्फरन्सला पीडीपीसोबत भागीदारी करावी लागेल असे त्यांना आधी सांगितले असते तर आपला पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सामील झाला नसता, असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेससाठी जागा सोडा असे म्हटले तर ती जागा पीडीपीऐवजी काँग्रेसला देण्यास प्राधान्य देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article