For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओमर अब्दुल्ला यांची घटस्फोट याचिका फेटाळली

06:02 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
ओमर अब्दुल्ला यांची घटस्फोट याचिका फेटाळली
Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांची घटस्फोटासाठी करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेत कोणतीही गुणवत्ता नसल्याने ती फेटाळण्यात येत आहे, असे न्या. संजीव सचदेवा आणि न्या. विकास महाजन यांच्या खंडपीठाने, दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी आपली पत्नी पायल हिच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात घटस्फोट अर्ज सादर केला होता. पत्नी आपल्याला क्रूरतेची वागणूक देते आणि आपली हेटाळणी करते असे आरोप त्यांनी अर्जात केलेले होते. तथापि, कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा अर्ज 2026 मध्ये फेटाळला होता. अब्दुल्ला यांनी त्यांचे आरोप सिद्ध केलेले नाहीत. तसेच त्यांनी आपल्या पत्नीवर ठेवलेले क्रूरतेचे आणि हेटाळणी आरोप अत्यंत अव्यवस्थित आणि मोघम स्वरुपाचे आहेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा दिला नाही, अशी कारणे स्पष्ट करत कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा घटस्फोट अर्ज फेटाळला होता.

Advertisement

उच्च न्यायालयात दाद

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा देत अब्दुल्ला यांनी अपील याचिका फेटाळली. याचिका फेटाळताना खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेली कारणे उचलून धरली आहे. ओमर अब्दुल्ला यांचा 15 वर्षांपूर्वीपासूनच पत्नी पायल हिच्याबरोबर वाद असून अब्दुल्ला यांनी घटस्फोटाची मागणी करणारा अर्ज दहा वर्षांपूर्वी दिल्लीच्या कनिष्ठ कौटुंबिक न्यायालयात सादर केला होता. पत्नीचा घटस्फोटाला विरोध आहे.

Advertisement
Tags :

.