For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ओमर अब्दुल्ला नव्या विवाह बंधनात

06:40 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओमर अब्दुल्ला नव्या विवाह बंधनात
Advertisement

पत्रकार निधी राझदानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राझदान यांच्याशी विवाह केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावर्षी ओमर अब्दुल्ला यांनी त्यांची पहिली पत्नी पायल अब्दुल्ला यांना घटस्फोट दिला होता. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर त्यांच्या विवाहाची बातमी शेअर केली. ‘काल एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली.’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर करत एक छायाचित्रही अपलोड केले आहे. ओमर अब्दुल्ला आणि निधी राझदान यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. निधी राझदान यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि शपथविधी समारंभांमध्येही उपस्थित राहिल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.