इराणच्या सुडाग्नीची ओमानला नाही झळ
इस्रायल-अमेरिकेच्या ऑपरेशनच्या प्रत्युत्तरादाखल इराणने मध्यपूर्वेतील अनेक देशांवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. दुबईपासून दोहापर्यंतच्या शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. परंतु आखातातील एक देश या हल्ल्यांपासून दूर राहिला. मध्यपूर्वेचा स्वीत्झर्लंड म्हणवून घेणाऱ्या ओमानमध्ये इराणकडून हल्ले करण्यात आले नाहीत.
इराण आणि ओमानमधील या संबंधांच्या मागे इतिहास, भूगोल, कूटनीति आणि स्ट्रॅटेजिक प्रॅक्टिकल विचारांचे मिळते-जुळते रुप आहे, ज्याचे मूळ 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत जाते.
50 वर्षांचे संबंध
ओमानमध्ये सुल्तान कबूस बिन सईद विरोधातील धोफर बंडादरम्यान इराणच्या शाहने मार्क्सवादी बंडखोरांना पराभूत करण्यासाठी हजारो इराणी सैनिकांना पाठविले होते. याचा परिणाम म्हणजे मस्कत अन् तेहरान यांच्यात एक पक्के सुरक्षा संबंध निर्माण झाले, जे दशकांपर्यंत चालले. 1979 नंतरही अनेक आखाती देशांची राजेशाही इराणकडे संशयाने पाहत असताना ओमानने स्वत:चे संबंध कायम राखले.या प्रारंभिक सहकार्याने दोन्ही देशांदरम्यान एक संस्थात्मक विश्वास निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली, जो इराणमध्ये सत्तापरिवर्तनानंतरही कायम राहिला.
मध्यपूर्वेचे स्वीत्झर्लंड
गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचा सदस्य असूनही ओमानची एक खास राजनयिक भूमिका राहिली आहे. ओमानने ऐतिहासिक स्वरुपात सौदी अरेबिया आणि त्याच्या काही शेजारी देशांच्या इराणविरोधी भूमिकेला स्वीकारण्यास नकार दिला आहे. ओमानने बहुतांशकरून हस्तक्षेप न करणारी रणनीति अवलंबिली असून इराण आणि पाश्चिमात्य देशांसोबत संतुलित संबंध राखले. ओमानने अनेकदा इराण आणि अमेरिकेदरम्यान मध्यस्थीचे काम केले आहे. ओमानने अमेरिकेसोबत केलेल्या बॅक चॅनल चर्चेमुळेच 2015 च्या आण्विक कराराचा मार्ग निर्माण झाला होता. ओमानने इराण आणि अमेरिकेदरम्यान सेतूची भूमिका बजावली आहे.
ओमानवर हल्ला पडणार महागात
ओमान आणि इराण मिळून होर्मुझच्या सामुद्रधुनीची देखरेख करतात. हा जगातील सर्वात आवश्यक ऑईल चोकपॉइंट आहे. आर्थिक रुपाने हा मार्ग दोन्ह देशांसाठी लाभदायक आहे.