For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य विभागासाठी सॉप्टवेअर तयार करुन 'महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन' स्पर्धेत ओम चौगुले यांची बाजी

03:48 PM Feb 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
आरोग्य विभागासाठी सॉप्टवेअर तयार करुन  महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन  स्पर्धेत ओम चौगुले यांची बाजी
software for health department
Advertisement

मिळवले एक लाखाचे बीजभांडवल

आळते वार्ताहर

Advertisement

प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी मिळेलच याची काही खात्री नाही, त्यामुळे तरुणांनी उद्योग उभारणीकडे वळावे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. महाविद्यालयीन किंवा आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असतात. पण त्याला मूर्त रुप मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या अशा नवसंकल्पनांचा शोध घेऊन त्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्यासाठी शासनातर्फे ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धा आयोजित केली जाते.यावर्षी झालेल्या स्पर्धेत पाडळी ता.तासगाव येथील ओम अशोक चौगुले (मूळ गाव कवठेपिरान) याने आरोग्य विभागात रुग्णांच्या नोंदीसाठी उपयोगी पडणारे 'एन.ए.बी.एच एक्सलन्स डेटा व्हिजवलाइजेशन युझिंग पॉवर बी.आय' हे साॅप्टवेअर सादरीकरण करुन सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.त्याला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते एक लाख रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.ओम चौगुले हा विटा येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरचा विद्यार्थी असून त्याला प्राचार्य पी.एस.पाटील, मार्गदर्शक सायली जाधव, प्रियांका तेलशिंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे,पोलीस अधीक्षक बसवराज तेली,आमदार सुधीर गाडगीळ,लिंबाजी पाटील, अशोक चौगुले उपस्थित होते.त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हाॅस्पीटलला NABH सर्टीफिकेशन करणे सोयीचे ठरेल.

Advertisement

एन.ए.बी.एच एक्सलन्स डेटा व्हिजवलाइजेशन युझिंग पॉवर बी.आय.हे आरोग्य विभागात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडणारे साॅप्टवेअर आहे. यांच्या माध्यमातून रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून त्याच्यावर करण्यात येणारा औषधोपचार व विविध टेस्ट बरोबरच रुग्ण बरा होऊन डिस्चार्ज होइपर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल त्यामुळे कोणत्याही हाॅस्पीटलला NABH सर्टीफिकेशन करणे सोयीस्कर होईल.
ओम अशोक चौगुले. (आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर,विटा)

Advertisement
Tags :

.