For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

20 नोव्हेंबरला झळकणार ‘ओम चॅप्टर 1’

06:03 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
20 नोव्हेंबरला झळकणार ‘ओम चॅप्टर 1’
Advertisement

धनुष अन् ममूटी मुख्य भूमिकेत

Advertisement

‘ओम चॅप्टर 1 : उधिरम-द ब्लड वुड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. धनुष आणि ममूटी याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. निर्मात्यांनी दोन्ही अभिनेत्यांना दर्शविणारे पोस्टर जारी केले आहे. यापूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन रजनीकांत यांच्या चित्रपटामुळे लांबणीवर टाकण्यात आले होते.

दिवाळीवेळी रणवीर कपूरचा ‘रामायण’ प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा चित्रपट ‘सीन’ही प्रदर्शित होईल. परंतु आता धनुषचा चित्रपटही त्याच कालावधीत प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा दिसून येणार आहे.

Advertisement

ओम चॅप्टर 1 चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी यांनी केले आहे. या चित्रपटात धनुष आणि ममूटी यांच्यासोबत साई पल्लवी, श्रीलीला आणि नसीरुद्दीन शाह देखील दिसून येणार आहे. धनुष आणि राजकुमार पेरियासामी यांनी यापूर्वी एका चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. तर पेरियासामी यांच्या ‘अमरन’ चित्रपटाला यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Advertisement
Tags :

.