For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष व महिला रिले संघाला ऑलिम्पिकचे तिकीट

06:29 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष व महिला रिले संघाला ऑलिम्पिकचे तिकीट
Advertisement

वृत्तसंस्था/ नासू (बहामास)

Advertisement

सोमवारी येथे झालेल्या विश्व अॅथलेटिक्स रिलेज या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरूष आणि महिला रिले संघांनी दर्जेदार कामगिरी करत येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.

महिलांच्या 4×400 मी. रिले प्रकारात झालेल्या दुसऱ्या फेरीतील हिटमध्ये भारतीय महिला धावपटू रुपाल चौधरी, एम. आर. पुवम्मा, ज्योतीका श्रीदंडी आणि शुभा वेंकटेश यांनी दुसरे स्थान मिळविताना 3 मिनिटे, 29.35 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात जमैकाने 3 मिनिटे, 28.54 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले.

Advertisement

पुरुषांच्या 4×400 मी. रिले प्रकारातील दुसऱ्या फेरीच्या हिटमध्ये भारताचे धावपटू मोहम्मद अनास याहिया, मोहम्मद अझमल, अरोकिया राजीव आणि अमोल जेकॉब यांनी दुसरे स्थान पटकाविताना 3 मिनिटे, 3.23 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या धावपटूंनी पहिले स्थान मिळविताना 2 मिनिटे, 59.95 सेकंदाचा अवधी नोंदविला. पुरुष आणि महिलांच्या सांघिक रिले प्रकारात दुसऱ्या फेरीत तीन हिटमध्ये पात्र ठरणारे पहिले दोन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी निश्चित होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आता या स्पर्धेसाठी भारताचे अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात आतापर्यंत 19 अॅथलिटस निश्चित झाले असून त्यामध्ये भालाफेकधारक व विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.