For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित

06:44 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित
Advertisement

वृत्तसंस्था/ प्राचीन ऑलिम्पिया, ग्रीस

Advertisement

‘अपोलो’च्या म्हणजे प्राचीन ग्रीक संस्कृतीतील सूर्यदेवतेच्या मदतीशिवाय देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जळत राहणार असलेली ज्योत दक्षिण ग्रीसमधील प्राचीन खेळांच्या ठिकाणी मंगळवारी प्रज्वलित करण्यात आली. ढगाळ आकाशामुळे पारंपरिक पद्धतीने ज्योत प्रज्वलित करण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही.

एरव्ही प्राचीन ग्रीक पुरोहित महिलेचा पोशाख परिधान केलेली अभिनेत्री सदर चांदीची मशाल प्रज्वलित करण्यासाठी सूर्याचा वापर करते. त्यापूर्वी सूर्यदेव ‘अपोलो’ची प्रतिकात्मक प्रार्थना केली जाते. इंधनाने भरलेल्या मशालीला प्रज्वलित करण्यासाठी पॅराबोलिक आरशाचा वापर केला जातो आणि त्यावर पडणारी सूर्यकिरणे आग प्रज्वलित करतात. त्याऐवजी शेवटच्या तालमीच्या दरम्यान त्याच ठिकाणी सोमवारी प्रज्वलित केलेली दुसरी मशाल त्याकरिता वापरण्यात आली. गंमत म्हणजे त्यानंतर काही मिनिटांनी सूर्य ढगांबाहेर येऊन तळपला. ही मशाल आता 3 हजार मैलांहून अधिक प्रवास करून यंदाचे ऑलिम्पिक ज्या ठिकाणी होणार आहे त्या फ्रान्सच्या राजधानीत म्हणजे पॅरिसमध्ये पोहोचणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.