महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उभादांडा किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाचे घरटे संरक्षित

11:35 AM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

घरट्यात अंदाजे ११५ ते १२० अंडी ; बीच व्यवस्थापक बस्त्याव ब्रिटो यांनी केली अंडी संरक्षित

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

ऑलिव्ह रिडले समुद्री कासव मादीचे वेंगुर्ले तालुक्यातील या वर्षीच्या हंगामातील पहिले घरटे वेंगुर्लेतील उभादांडा सुखटनवाडी समुद्रकिनारी दिसून आले आहे. सदर घरट्यात अंदाजे ११५-१२० अंडी असून बीच व्यवस्थापक बस्ताव बावतीस ब्रीटो यांनी ती अंडी संरक्षित केलेली आहेत.सदर अंड्यांचा पंचनामा कुडाळचे वनक्षेत्रपाल (प्रा.) संदिप कुंभार यांच्या उपस्थितीत मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी केलेला असून कासव अंडी संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक मार्गदर्शन स्थानिकांना करण्यात आलेले आहे.

चालू हंगामात सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, व सहायक वन संरक्षक (खा. कू.तो व वन्यजीव) सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजनातून आणि स्थानिक बीच व्यवस्थापक आणि वनकर्मचारी यांच्या मदतीने जास्तीत जास्त समुद्री कासव अंडी संरक्षण व संवर्धन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व स्थानिक नागरिक यांना या समुद्री कासव संवर्धनात वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# Olive Ridley turtle nest protected at Ubadanda beach# vengurla #
Next Article