For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरी फुटबॉलला खुन्नसची बाधा ! कोल्हापूरचा फुटबॉल झाला बदनाम

04:37 PM Apr 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापुरी फुटबॉलला खुन्नसची बाधा   कोल्हापूरचा फुटबॉल झाला बदनाम
Kolhapur football
Advertisement

खेळाडूंमधील खिलाडवृत्ती गेली तरी कुठे, जुन्या जाणत्या खेळाडूंचा परखड सवाल, संघ समर्थकांच्या हुल्लडबाजीने गाठली खालची पातळी

संग्राम काटकर कोल्हापूर

प्रत्येक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभी आयोजक सांगत असतात, पाण्याच्या बाटलीला छत्रपती शाहू स्टेडियममध्ये नो एंट्री. पण तरीही स्टेडियममध्ये बिनधास्तपणे बाटल्या आणल्या जातात. नंतर याच बाटल्या सामन्यात वादावादी करणाऱ्या विरूद्ध संघाच्या खेळाडूंच्या दिशेने भिरकावतात. खेळाडू तर नाहक खुन्नशीपाई चेंडू सोडून एकमेकांच्या अंगावर धावतात. सामन्यात पंचांनी एका संघाच्या बाजूने निर्णय दिला की विऊद्ध संघाचे समर्थक पंचावर चिटींगचा आरोप करतात. रविवारी शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) या संघांच्या खेळाडूंनी मारामारी करत खिलाडूवृत्ती सोडून दिल्याचे दाखवून दिले. एकंदरी या सगळ्या प्रकारामुळे कोल्हापूरी फुटबॉल विस्कळीत होऊन बदनामीच्या कटघऱ्यात आला आहे. हा विस्कळीत पणा असाच राहिला तर कोल्हापूरी फुटबॉलचे भविष्य धोक्यात येणार मात्र निश्चित.

Advertisement

कोल्हापुरात तालीम व मंडळाचे असलेल्या 16 फुटबॉल संघांमधून कोल्हापूरात फुटबॉलज्वर किती रूजला आहे हेच स्पष्ट होते. शिवाय संघांनी सामन्यात दर्जेदार खेळ कऊन कोल्हापूरी फुटबॉलला ग्लॅमर आणले आहे. या ग्लॅमरपोटीच छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धांमधील सामने पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसारखी गर्दी होत असते. दिलबहार तालीम मंडळ, शिवाजी तऊण मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, बालगोपाल तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ या संघांचे सामने असतील तर तो पाहण्यासाठी स्टेडियममध्ये संघ समर्थक व फुटबॉल शौकिनांची गर्दी उसळणार म्हणजे उसळणार. मात्र हीच उसळती गर्दी आणि गर्दीतून उफाळणारी टोकाची खुन्नस कोल्हापूरी फुटबॉलची डोकेदुखी बनली आहे. शिवाय गर्दीतील हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच हुल्लडबाज फुटबॉलचे वातावरण दुषित करत आहेत. काही हुल्लडबाज तर थेट दाऊ पिऊन आणि गुटखा खाऊन स्टेडियममध्ये असतात. इतकेच नव्हे तर काही हजाराच्या घरात संघ समर्थक प्रेक्षक तिकिट न काढता स्टेडियमध्ये घुसतात. सामन्यात खेळाडूंची वादावादी झाली लागलीच हुल्लडबाज आपल्या संघाच्या विऊद्ध संघाच्या खेळाडू व समर्थकांकडे पाहून अर्वाच्च भाषेथ शिवीगाळ करत चेतावणीच देतात. सात जन्माचे वैर असल्यासारखी ही चेतावणी असते. आपल्या संघाने सामना अथवा स्पर्धा जिंकल्यानंतर संघ समर्थकांकडून आघोरी पद्धतीने आनंदोत्सव साजरा करताना पराभूत संघ समर्थकांना हिणवण्याचाही प्रयत्न असतो. शाहू छत्रपती केएसए (लीग) वरिष्ट गट साखळी फुटबॉल स्पर्धेच्या सुऊवातीलाच शिवाजी तऊण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामन्यावेळी दोन्ही संघ समर्थकांनी एकमेकांवर केलेल्या तुफान दगडफेकीला शहरवासियांनी ट्रोलिंग केले होते. फुटबॉलच बंद करा, अशीही भावना व्यक्त केली होती.

खेळाडूंमध्ये स्लेजिंगचा प्रकार वाढतोय...
गेल्या तीन वर्षांपासून खेळाडूंचा तर निराळाच प्रकार सुऊ आहे. मनात खुन्नस ठेवत सामन्यात विऊद्ध संघांच्या खेळाडूंना स्लेजिंग कऊन भडकावण्याचा प्रकार काही खेळाडू करताहेत. विऊद्ध संघाच्या खेळाडूने बेजबाबदार खेळावे, आपल्याशी वादावादी-मारामारी कऊन यलो अथवा रेडकार्ड घ्यावे, असे स्लेजिंग करण्यामागे कारस्थान असते. मात्र हेच कारस्थान नंतर खेळाडू व समर्थकांत मारामारी होण्याला कारणीभूत ठरत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. दुसरीकडे फुटबॉल मधील जुने जाणते खेळाडू सध्याच्या खेळाडूंवर गंभीर आरोप करताहेत. ते सांगतात की खेळाडूमध्ये खिलाडूवृत्तीचा अभाव दिसतो आहे. काही खेळाडू तर नुसती ठेवून आणि प्रेक्षकांच्या सांगण्यानुसार सामना खेळताना दिसतात. हे कोल्हापूरी फुटबॉलच्या भवितव्यसाठी धोकादायक आहे. काही संघाचे काही पदाधिकारी खेळाडूंच्या भांडतात सहभागी होतात, हे ही फारच वाईट आहे. या वाईट प्रकारातून अन्य खेळाडूही एकमेकांशी भिडतात. खेळाडूंना भिडले की स्टेडियमच्या गॅलरीत संघ समर्थक एकमेकांशी भिडत तणाव निर्माण करतात.

Advertisement

किळसवाण्याच्या प्रकाराचा शिरकाव...पेठापेठांत कमालीची दरी
गतवर्षीच्या फुटबॉल हंगामापासून तर किळसवाण्या प्रकाराचा कोल्हापूरी फुटबॉल हंगामात शिरकाव झाला आहे. सामन्यावेळी खेळाडूंमध्ये वादावादी झाली की काही संघांचे समर्थक आपल्याकडील बाटलीत लघूशंका कऊन तर काहीजण मावा-गुटखा बाटलीत थुंकून त्या खेळाडूंना फेकून मारतात. हा सगळा प्रकार खुद्द पोलीसांसमोर करायला मागे पुढे पाहिले जात नाही. पोलीसही धडक कारवाईचे करत नसल्याने आपण काहीही केले तरी चालते, अशाच अविर्भावात संघांचे समर्थक असतात. या सगळ्या प्रकारामुळेच पेठापेठांमध्ये कमालीची दरी निर्माण झाली आहे. या दरीचे पडसाद गणेश विसर्जन मिरवणूकीतही उमटतात आणि मिरवणूकीतील पडसाद पुन्हा पुढील वर्षीच्या फुटबॉल हंगामात उमटतात. गेल्या अनेक वर्षापासूनचे हे वास्तव बदलले गेले नाही फुटबॉलची विस्कटलेली घडी निट करणे अवघड जाईल.

लहान मुले आणि तरूणांमध्ये वाढतोय उन्माद...
कोणत्याही कारणास्तव स्पर्धा आयोजकांशिवाय अन्य कोणालाही शाहू स्टेडियमच्या मैदानात सामन्यावेळी जाता येणार नाही, असा केएसएचा नियम आहे. बहुधा हा पाळला सुद्धा जातो. मात्र खेळाडूंमध्ये वादावादी, मारामारीचा प्रकार घडला की अनेक लहान मुले, तऊण बिनधास्तपणे मैदानात येतात. हा प्रकार शिवाजी मंडळ व पाटाकडील यांच्यात झालेल्या दोन्हीही सामन्यावेळी सर्वांना पहायला मिळाला आहे. काही जण तर खेळाडूंकडे पाहून अश्लिल हावभार, शेरेबाजी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना सापडले आहेत. याची गंभीर दखल घेऊन पुढील सामन्यामध्ये लहान मुले व तऊण मैदानात येणार नाही, अशी व्यवस्था स्पर्धा आयोजक व केएसएकडून केली जावी, अशी मागणी फुटबॉल शौकिन करताहेत.

Advertisement
Tags :

.