महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ओलेक्ट्रा’चा इलेक्ट्रिक बस निर्मितीवर भर

06:58 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रातून सर्वाधिक ऑर्डर : उत्पादन क्षमतेला देण्यात येणार वेग

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक कंपन्या इलेक्ट्रिक बस व्यवसायामध्ये उतरत असल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रिक बसची मागणी वाढली असून ओलेक्ट्रा ग्रीन टेक कंपनीने आपल्या कारखान्यामध्ये बस निर्मितीच्या कार्यालयाला वेग दिला आहे.

भारतातील इलेक्ट्रिक बसच्या निर्मितीतील दिग्गज कंपनी म्हणून ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड यांचा उल्लेख केला जातो. अलीकडच्या काळात यांच्या इलेक्ट्रिक बसच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने तेलंगणामध्ये सितारामपूर येथे नव्या ग्रीन फील्ड कारखान्याची उभारणी करण्याच्यादृष्टीने चाचणी सुरू केली असून या कामाला लवकरच वेग दिला जाणार आहे.

कंपनीला सर्वाधिक बसची ऑर्डर

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीकडे 8 हजार 209 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर होती. कंपनीने आतापर्यंत 214 इलेक्ट्रिक बसची डिलिव्हरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसच्या ऑर्डरमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन पुढील काळामध्ये कंपनी व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीनेही विचार करू शकते. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या ऑर्डरपैकी सर्वाधिक बसची ऑर्डर ही महाराष्ट्रामधून प्राप्त झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात रस्त्यांवर इलेक्ट्रिक बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ओलेक्ट्रा ग्रीन टेकने 250 इलेक्ट्रिक बसची डिलिव्हरी केली असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्पादन क्षमता 5 हजारपर्यंत वाढवणार

वर्षाच्या अखेरपर्यंत 1000 इलेक्ट्रिक बसची डिलिव्हरी करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असतील. आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत कंपनी तेलंगणातील सितारामपूर येथे कारखाना सुरू करू शकते. सदरचा कारखाना प्रत्यक्षात सुरू झाला की या अंतर्गत कंपनी आपली उत्पादन क्षमता वार्षिक 5 हजार इलेक्ट्रिक बस इतकी करू शकते. नंतरच्या काळामध्ये वार्षिक 10 हजार बसची निर्मिती करण्याची योजनाही कंपनीने विस्तारांतर्गत केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article