ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा समभाग वधारला
06:37 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
सोमवारी शेअर बाजारामध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमीटेड यांचा समभाग इंट्रा डे दरम्यान 4 टक्के वाढलेला पहायला मिळाला. कंपनीला अलीकडेच कंत्राट प्राप्त झाले आहे. इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्यासाठी तेलंगणामधील रस्ते वाहतूक मंडळाकडून 1800 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले. या अंतर्गत 1085 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करावा लागणार आहे. या बातमीनंतर कंपनीचा समभाग 1061 रुपयांवर वाढीसह पोहोचला होता. 12 वर्षाच्या कंत्राटाअंतर्गत बसच्या देखभालीची जबाबदारी कंपनीला पहावी लागणार आहे.
Advertisement
Advertisement