For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थडग्यात मिळाली बियरची सर्वात जुनी बाटली

06:38 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
थडग्यात मिळाली बियरची सर्वात जुनी बाटली
Advertisement

चीनमध्ये 9 हजार वर्षांपूर्वी देखील मद्य तयार केले जात होते. तांदूळ, कंद, फळे आणि अन्य रोपांच्या हिस्स्याला फरमेंट करून बियर तयार करण्यात येत होती. चालू वर्षी चीनच्या निंग्जियामध्ये शान्जियाबो दफनभूमीत स्थित 2200 वर्षांपेक्षाही जुन्या एका थडग्यातून बहुधा जगातील सर्वात जुनी बियरची बाटली मिळाली आहे.

Advertisement

शतकांपासून बियरला महत्त्व दिले जात होते. याचमुळे काही लोकांना याच्यासोबत दफन केले जात होते. चीनमध्ये पुरातत्वतज्ञांना एका अशाच थडग्यामध्ये कांस्यच्या बाटलीत बंद बियर मिळाली आहे. यात 15 कपहून (3.7 लिटर) अधिक बियर होती. ही बियर बाजरी आणि बहुधा गव्हापासून तयार करण्यात आली होती. मग थडग्यात एका गिफ्टच्या स्वरुपात ठेवण्यात आली होती. मृतासाठी परलोकात सेवन करण्यासाठी ती ठेवण्यात आली असावी.

प्राचीन चीनमध्ये मद्य निर्मितीच्या अनेक पद्धती प्रचलित होत्या असे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ ली लियू यांचे सांगणे आहे. आणखी एका संशोधनात चीनच्या शांक्सी प्रांतात स्थित 2300 वर्षे जुन्या किन राजघराण्याच्या मकबऱ्यातून प्राप्त प्राचीन बियरची चाचणी सामील आहे. याचा अहवाल त्यांच्या टीमने 2024 मध्ये प्रकाशित झाला होता, त्याप्रकरणात बियर गहू, बाजरी, डाळी आणि एका गवताचय बियांनी तयार करण्यात आली होती.

Advertisement

बियरची बाटली

फर्मेंटेशन बहुधा धान्य, खमीर, अन्य सुक्ष्मजीवांनी युक्त स्टार्टर कल्चरद्वारे सुरू झाले असावे असे संशोधनातून कळते. याला चिनी भाषेत ‘क्वू’ म्हटले जाते. 2026 साली मिळालेल्या प्राचीन बियरच्या शोधात क्वूच्या वापराचे पुरावे मिळाले नाहीत. याला आपण प्राचीन चीनमध्ये प्रचलित परिष्कृत मद्य निर्माण करण्याच्या प्रक्रियांचा एक महत्त्वपूर्ण घटक मानतो, दोन्ही शोध महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते या कालावधीदरम्यान उत्तर चीनमध्ये बियर निर्माण करण्याच्या परंपरांच्या लेखी तपशीलाची ते पुष्टी देतात असे ल्यू यांचे सांगणे आहे.

हे शोध झोउ आणि किन काळानंतर जवळपास ख्रिस्तपूर्व 8 व्या आणि 3 ऱ्या शतकाच्या दरम्यान वेगाने विशिष्ट मद्य निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानांनुसार एक महत्त्वपूर्ण पुरातात्विक आधार आहे. निंग्जिया अन् शांक्सी प्रांतातील थडग्यामंधून मिळालेली बियर प्राचीन आहे आणि याचमुळे दुर्लभ देखील आहे. कारण ते तरल अवस्थेत सुरक्षित आहेत. परंतु ही सर्वात जुनी बियर नाही. चिनी थडग्यांमध्ये 3 हजार वर्षे जुन्या धान्याने निर्मित तरल पेयपदार्थही आढळून आले आहेत. परंतु हे कांस्यच्या बाटलीत बंद स्वत:च्या मूळ स्वरुपात मिळणारी ही पहिली बियर असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

पुरातत्व तज्ञांना चीनच्या हेनान प्रांतात मातीच्या भांड्यांच्या अवशेषांमध्ये नवपाषाण काळातील बियरचे जैविक अवशेषही मिळाले होते. हे बियर बहुधा 9 हजार वर्षे जुनी होती. हेनानच्या या प्राचीन बियरमध्ये मुख्य धान्य म्हणून भाताचा वापर करण्यात आला होता. तसेच मध अन् फळेही मिसळली जात होती. नवपाषाण काळातील ही प्रक्रिया नंतर विकसित होणाऱ्या चिनी फर्मेंटेड धान्य आधारित ड्रिंक्सची प्रारंभिक अवस्था होती असे संशोधकांचे मानणे आहे.

बियरचा सर्वात जुना पुरावा

जगात बियरचा सर्वात जुना पुरावा उत्तर इस्रायलच्या राकेफेट गुहेतून मिळतो. तेथे जवळपास 12 हजार ते 14 हजार वर्षांपूर्वी नटुफियन संस्कृतीचे लोक राहत होते. तेथील थडग्यांमधून मिळालेल्या दगडी भांड्यांवर असलेल्या अवशेषांच्या विश्लेषणातून नटुफियन लोक गहू किंवा जौद्वारे बियर तयार करत होते असे कळले. ही बियर बहुधा धार्मिक भोजनांमध्ये लोकांना पिण्यासाठी दिली जात होती.

Advertisement
Tags :

.