सीरियात मिळाली सर्वात जुनी वर्णमाला
पुरातत्व तज्ञांनी केला चकित करणारा दावा
अमेरिकेच्या संशोधकांनी सीरियात एका थडग्यातून मातीचे सिलिंडर शोधून काढले आहेत, त्यावर नक्षीकाम करण्या आले होते. याला जगातील सर्वात जुनी ज्ञात वर्णमाला लेखन म्हणजेच अल्फाबेट रायटिंग ठरविले जात आहे. कार्बन-14 डेटिंग तंत्रज्ञानांचा वापर करत जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी सिलिंडर सुमारे ख्रिस्तपूर्व 2400 साली तयार करण्यात आला होता असा अनुमान व्यक्त केला आहे. कुठल्याही अन्य ज्ञात वर्णमाला लिपीपेक्षा सुमारे 500 वर्षे जुनी ही सामग्री असल्याचे सांगण्यात आले. संशोधकांनी प्रारंभिक कांस्य युगाच्या थडग्यांचा शोध लावला असून ज्यात एक चांगल्याप्रकारे संरक्षित कब्र देखील सामील आहे.
मृतदेहांसोबत सोने, चांदीचे दागिने, कुकवेअर, एक भाला आणि मातीची भांडी सापडली आहेत. मातीच्या भांड्यांच्या बाजूला चार मातीचे सिलिंडर होते, त्यावर वर्णमाला लेखन कोरण्यात आले होते. लोक नव्या संचार तंत्रज्ञानांसोबत खूप पूर्वी एका वेगळ्या ठिकाणी प्रयोग करत होते, ज्याची कल्पना आम्ही आतापर्यंत केली नव्हती असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील पुरातत्व विभागाचे प्राध्यापक ग्लेन श्वार्ट्ज यांनी म्हटले आहे.
वर्णमाला अस्तित्वात येण्यापूर्वी मानवी संस्कृती संवादासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करत होती. मेसोपोटामियाच्या सुमेरियोंनी क्यूनिफॉर्म किंवा छोट्या प्रतिमांचा वापर केला, तर प्राचीन इजिप्तिशियन लोकांनी चित्रलिपी विकसित केली होती. तर चिनी अक्षरांनी लेखी भाषेला तुकड्यांमध्ये तयार केले होते. वर्णमालेचा आविष्कार ख्रिस्तपूर्व 1900 सालानंतर इजिप्त किंवा त्याच्या आसपास झाला होता असे यापूर्वी तज्ञांचे मानणे होते. आम्ही कलाकृती जुन्या असून मानचित्रावर एक वेगळ्या क्षेत्रातील आहेत. यातून वर्णमालेची उत्पत्तिची कहाणी आमच्या विचारापेक्षा खूपच वेगळी असू शकते असे श्वार्ट्ज यांनी म्हटले आहे.