For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या पँटने उजळवले भाग्य

06:25 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुन्या पँटने उजळवले भाग्य
Advertisement

कोणाचे भाग्य कधी फळफळेल, हे सांगता येणे अशक्य आहे, अशी एक म्हण आहे. अशा घटना अनेकदा आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो. कित्येकदा अशा लोकांच्या अशा प्रकारे उजळलेल्या भाग्याचा आपल्याला हेवाही वाटतो. अशीच एक घटना अमेरिकेच्या न्यू जर्सी या प्रांतात वास्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीने सहज म्हणून आपल्या जुन्या (उपयोगात नसलेल्या) पँटीच्या खिशात हात घातला आणि तो कोट्यावधी डॉलर्सचा धनी झाला. त्याने मे 2025 मध्ये एक लॉटरीचे तिकीट एका पेट्रोल पंपावर खरेदी केले होते. ते त्याने त्या पँटीच्या खिशात टाकले आणि नंतर ही घटना तो विसरुनही गेला. यथावकाश या लॉटरीचा परिणाम घोषित झाला. पण कोट्यावधी रुपये लागलेल्या एका क्रमांकावर अद्याप एकाही व्यक्तीने आपला अधिकार सांगितलेला नाही, असेही या लॉटरीच्या कंपनीने घोषित केले. तरीही या व्यक्तीला आपले तिकिट तपासून बघावे असे वाटले नाही. कारण त्याला या घटनेचेच पूर्णत: विस्मरण झाले होते. पण लॉटरी लागल्यानंतर जवळपास एक वर्षाने त्याला त्या जुन्या पँटच्या खिशात हात घालण्याची बुद्धी झाली आणि जणू धनराशीच त्याच्या हाती लागली. त्याने त्वरित त्या लॉटरी कंपनीशी संपर्क केला.

Advertisement

लॉटरी फुटल्याला आता एक वर्ष झाले होते. तरीही नियमानुसार कंपनीने त्याला त्याच्या तिकिटाच्या क्रमांकावर लागलेली रक्कम दिली. ही रक्कम 59 लाख डॉलर्स किंवा भारतीय रुपयांमध्ये जवळपास 57 कोटी रुपये इतकी होती. त्यामुळे तो एका फटक्यात अब्जाधीश झाला. इतकेच नव्हे, तर कंपनीने तिकिट धारकांना त्यांची जुनी तिकिटे सांभाळून ठेवण्याचा सल्लाही दिला आहे. सहसा मोठी लॉटरी लागलेले लोक पैशाचा क्लेम करण्यास विसरत नाहीत. पण ज्यांच्या तिकिटांना छोट्या रकमा लागलेल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेकजण तिकिटे विसरुन जातात किंवा रक्कम क्लेम करत नाहीत. असे तिकिटधारक नंतरही कंपनीकडे पैसे मागू शकतात. कारण त्यांना लागलेले पैसे लॉटरी कंपनीकडे सुरक्षित असतात. लॉटरी क्लेम करण्यासाठी विशिष्ट कालावधीचे बंधन असेल, तर मात्र, त्या कालावधीतच रक्कम घ्यावी लागते, असेही या निमित्ताने अनेक तज्ञांकडून स्पष्ट केले गेले.

Advertisement
Advertisement
Tags :

.