अंतराळातून खाली येतोय जुना उपग्रह
युरोपीय अंतराळ संस्थेच्या उपग्रहाची होणार री-एंट्री
युरोपीय अंतराळ संस्थेचा एक जुना उपग्रह पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत आहे. 8 सप्टेंबर रोजी हा उपग्रह वायुमंडळात पुनर्प्रवेश करणार आहे. वायुमंडळात दाखल होताच तो पेटू लागेल. अंतराळ संस्था या उपग्रहाला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर कोसळविणार आहे, जेणेकरून अंतराळात यामुळे कचरा फैलावू नये. याकरता दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
सर्वकाही सुरळीत राहिले तर हा उपग्रह प्रशांत महासागरात कोसळणार आहे. सालसा उपग्रह सुमारे 1.30 लाख किलोमीटरचे अंतर कापून पृथ्वीवर येणार आहे. मागील वर्षी युरोपीय अंतराळ संस्थेने एओलस वेदर सॅटेलाइटला पृथ्वीवर नियंत्रित पद्धतीने कोसळविले होते. अशाप्रकारे उपग्रहाला पृथ्वीवर आणण्याच्या प्रक्रियेला गायडेड री-एंट्री म्हटले जाते.
युरोपीय अंतराळ संस्थेने 2000पासून सलग 4 एकसारखे उपग्रह अंतराळात पाठविले होते. त्यांची नावे सालसा, रंबा, टँगो आणि सांबा अशी होती. या उपग्रहांचे काम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर नजर ठेवणे आहे. या चारही उपग्रहांचा अंतराळात एक क्लस्टर तयार करण्यात आला होता.
अद्याप मिळतोय डाटा
क्लस्टरचे आयुष्य केवळ 2 वर्षे होते, परंतु सालसा वगळता उर्वरित सर्व उपग्रह अद्याप कार्यरत आहेत. चारही उपग्रहांनी सुमारे 24 वर्षे काम केले आहे, त्यांच्याकडून सातत्याने डाटा प्राप्त होत राहिला आहे. अंतराळ संस्थेने 2002 मध्ये चारही उपग्रहांच्या क्लस्टर्सला निवृत्त घोषित केले होते.
दुर्घटना होऊ नये म्हणून..
अंतराळात वाढणारा कचरा विचारात ईएसएने सालसा उपग्रहाची गायडेड री-एंट्री करविण्याची योजना आखली आहे. अंतराळात कुठल्याही प्रकारचा कचरा न सोडता हा उपग्रह पृथ्वीवर परतणार आहे. एखाद्या उल्कापिंडाच्या टक्करपेक्षा अधिक धोका उपग्रहाचा एखादा तुकडा पृथ्वीला धडकण्याचा असल्याचे वैज्ञानिकाचे मानणे आहे. याचमुळे त्यांचा धोका कमी करण्यासाठी अशाप्रकारे हे उपग्रह पृथ्वीवर आणले जातात.