महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वृद्ध-दिव्यांगांची पेन्शन विस्कळीत

10:37 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाभार्थ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न : प्रशासनाचे दुर्लक्ष : तीन महिन्यांपासून मासिक पेन्शनपासून वंचित

Advertisement

बेळगाव : मागील तीन महिन्यांपासून वृद्ध-दिव्यांग आणि निराधारांची मासिक पेन्शन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच पेन्शन  ठप्प झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येवू लागल्या आहेत. परिणामी दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे प्रशासन आपल्याकडे लक्ष देणार का? अशी हाक लाभार्थ्यांनी दिली आहे. वृद्ध, दिव्यांग, निराधार, विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाकडून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून काही लाभार्थ्यांची पेन्शन ठप्प झाली आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडूनदेखील समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.

Advertisement

त्यामुळे पेन्शन सुरळीत करण्यासाठी कोठे जावे? असा प्रश्नही त्यांच्यासमोर पडला आहे. विशेषत: वृद्ध आणि दिव्यांगांचे पेन्शनविना हाल होताना दिसत आहेत. जिल्ह्यात वृद्ध-दिव्यांग आणि निराधार मासिक पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांची पेन्शन ठप्प झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काहींनी कागदपत्रांची पूर्तत: करून पेन्शन पूर्ववत सुरू केली आहे. मात्र काहींची पेन्शन अद्याप ठप्पच आहे. त्यामुळे दैनंदिन उदरनिर्वाह करताना त्यांच्या समोर अडचणी येवू लागल्या आहेत. काही वृद्ध-दिव्यांग यांचा उदरनिर्वाह मासिक पेन्शनवरच चालतो. मात्र पेन्शन ठप्प झाल्याने जगायचे कसे? असा प्रश्नही पडला आहे. मागील दोन वर्षांपासून पेन्शन विस्कळीत होऊ लागली आहे. काहीवेळा दोन-तीन महिन्यांनंतर पेन्शन दिली जाते. तर काहीवेळा दोन महिन्यांनंतर पेन्शन जमा होते. तर काही लाभार्थ्यांची तीन महिन्यांपासून पेन्शनच मिळाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर चिंता वाढली आहे.

बोगस लाभार्थ्यांमुळे फटका 

मध्यंतरी बोगस लाभार्थ्यांनी बेकायदेशीर पेन्शन सुरू केली होती. एजंटांकरवी कमी वयाच्या तरुणांनीदेखील पेन्शन घेतल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे याचा वयोवृद्ध आणि दिव्यांग पेन्शनधारकांना फटका बसला. बोगस पेन्शन लाभार्थ्यांमुळे इतर पेन्शनधारकही अडचणीत आल्याचे दिसत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article