For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओला करणार 2 हजार कोटींची गुंतवणूक, उत्पादन वाढीवर भर

06:38 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओला करणार 2 हजार कोटींची गुंतवणूक  उत्पादन वाढीवर भर
Advertisement

संस्था/ बेंगळूर

Advertisement

इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या सहकारी कंपन्यांमध्ये 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातली माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

2 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश हा भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि बॅटरी सेलच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी असेल. मिळालेल्या माहितीनुसार 2 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी 1500 कोटी रुपये सहकारी कंपनी ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जी इलेक्ट्रीक वाहन निर्मिती आणि सेवा संबंधित काम पाहते. इतर 500 कोटी रुपयांची गुंतवणूक ही ओला सेल टेक्नॉलॉजीज या सहकारी कंपनीमध्ये केली जाणार असून ही सहायक कंपनी बॅटरी सेलची निर्मिती आणि त्यांची बाजारामध्ये विक्री करण्याचे काम करते.

Advertisement

Advertisement
Tags :

.