‘ओला’ला ग्राहक मंचचा जबदरस्त दणका
स्कूटरची पूर्ण रक्कम 1,10, 495 ग्राहकाला परत करा : त्रासांबद्दलचे 30 हजार, न्यायालय खर्च 15 हजार द्या, उत्तर गोवा ग्राहक मंचकडून ऐतिहासिक निवाडा
पणजी : वादग्रस्त ओला इलेक्ट्रिक वाहन कंपनीला दणका देताना ग्राहकाला ओला स्कुटर वाहनाची पूर्ण रक्कम रु.1, 10,495 /- परत करणे, सदोष वाहनामुळे झालेल्या त्रासाबद्दल तीस हजार रुपये आणि न्यायालयीन खर्चाचे पंधरा हजार रुपये देण्याचा आदेश उत्तर गोवा ग्राहक मंचाने दिला आहे. विठ्ठलपूर साखळी येथील तीर्थराज पुंडलिक पुजारी यांनी जानेवारी 2024 महिन्यात ओला स्कूटर पर्वरी येथील ओला इलेक्ट्रिक टेकनॉलॉजी प्रा. लि.च्या शोऊममधून खरेदी केली होती.
दुसऱ्याच दिवशी स्कुटरीत बिघाड
खरेदीच्या दुसऱ्याच दिवशी वाहनात बिघाड झाल्याने कंपनीकडे तक्रार नोंदवण्यात आली. कंपनीने वाहन दुऊस्त करून द्यायला महिन्यापेक्षा जास्त कालावधी घेतला. पण वाहनात पुन्हा बिघाड निर्माण झाला.
वर्षभरात नऊ तक्रारी दाखल
पुढच्या वर्षभरात नऊ तक्रारी करण्यात आल्या. दरखेपी अनेक दिवस वाहन सर्व्हिस सेंटर येथे पडून राहायचे. गेल्या चार महिन्यांपासून वाहन नादुऊस्त अवस्थेत वाळपई येथे पडून आहे.
ग्राहकाला अनेक अडचणींचा त्रास
कामावर जाण्यासाठी घेतलेली ओला स्कूटर सतत नादुऊस्त होत असल्याने ग्राहकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओला कंपनीने वाहन दुऊस्तीच्या सेवेतील त्रुटींची तक्रार तसेच सदोष वाहन बदलून देण्याची केलेली विनंती यांची दखल घेतली नाही. तीर्थराज पुंडलिक पुजारी यांनी अॅड. विराज बाक्रे यांच्यामार्फत उत्तर गोवा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्यावर, ग्राहक मंचाने त्यांना दिलासा दिला.
ओला इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीच्या विरोधात आलेल्या तक्रारीच्या सुनावणी नंतर उत्तर गोवा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा बेला नाईक, सदस्य ओरोलीयानो दी ओलीवेरा आणि रेजिथा राजन यांनी ओला इलेक्ट्रिक वाहन कंपनीला दणका देताना ग्राहकाला ओला वाहनाची पूर्ण रक्कम रु.1, 10,495 /- परत करणे, सदोष वाहनामुळे झालेल्या त्रासाबद्दल तीस हजार ऊपये आणि न्यायालयीन खर्चाचे पंधरा हजार ऊपये, असे सर्व मिळून 1. 55 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.