For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओला इलेक्ट्रिक 2,000 कोटी रुपये उभारणार

06:02 AM Mar 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओला इलेक्ट्रिक 2 000 कोटी रुपये उभारणार
Advertisement

उपकंपनीतील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत

Advertisement

नवी दिल्ली :

इलेक्ट्रिक वाहन निर्माता ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी निधी उभारण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, कंपनी आपली उपकंपनी ओला सेल टेक्नॉलॉजीज (ओसीटी) मधील काही हिस्सेदारी विकून सुमारे 2,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. या माध्यमातून कंपनी आपला बॅटरी-संबंधित व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. याशी संबंधित सूत्रांनुसार, हा निधी उभारण्यासाठी कंपनी अनेक मोठ्या गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. यामध्ये सॉवरेन वेल्थ फंड आणि जागतिक पायाभूत सुविधा गुंतवणूकदारांचा समावेश असू शकतो. असे सांगितले जात आहे की, या संपूर्ण निधी उभारणी प्रक्रियेची जबाबदारी अवेनदास कॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल यांना देण्यात आली आहे.

Advertisement

 स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञानावर भर

ओला सेल टेक्नॉलॉजीजचे मुख्य लक्ष भारतात या बॅटरी सेलच्या संशोधनावर आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनावर आहे. कंपनीचे उद्दिष्ट स्वत:चे बॅटरी तंत्रज्ञान विकसित करणे आहे, जेणेकरून बॅटरी सेलसाठी इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल. याचदरम्यान दोन वर्षापूर्वी ऑगस्ट 2024 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने आपल्या आयपीओद्वारे सुमारे 5,500 कोटी रुपये उभारले.

Advertisement
Tags :

.