For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओला इलेक्ट्रिक कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे केला अर्ज

06:27 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
ओला इलेक्ट्रिक कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे केला अर्ज
Advertisement

कंपनी 5500 कोटी रुपये उभारणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील मोठी कंपनी ओला इलेक्ट्रिक आपला आयपीओ पुढील वर्षी शेअर बाजारात सादर करणार आहे. देशातील पहिल्या वहिल्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा हा आयपीओ असणार आहे. सदरच्या आयपीओ सादरीकरणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे कंपनीने सुपूर्द केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 5500 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.

Advertisement

ओलाचे संस्थापक आणि सीईओ भावेश अग्रवाल हे 47.4 दशलक्ष समभाग आयपीओअंतर्गत विक्री करणार आहेत. इतर भागधारक जसे की, इंडस् ट्रस्ट, डीआयजी इन्व्हेस्टमेंट, सॉफ्टबँक व्हिजन फंड, मॅट्रीक्स पार्टनर्स, अल्फावेव्ह वेंचर्स, हे देखील समभागांची विक्री करणार आहे. 2017 मध्ये या कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते आणि आजघडीला देशांतर्गत बाजारामध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाटा विक्रीमध्ये उचलत आघाडीवरची कंपनी राहण्याचा मानही याच कंपनीकडे आहे.

Advertisement
Tags :

.