भेंडीची कॉफी, अब्जावधींचा व्यवसाय
बीज सुकवून होते तयार
कॉफीची सवय असलेले अनेक लोक आहेत. परंतु कॅफिनमुळे अनेक लोक कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करू इच्छितात. अशा स्थितीत जगात एक अनोखा पर्याय लोकप्रिय होत आहे. भेंडीची कॉफी किंवा ओक्रा सीड कॉफीचा पर्याय समोर आला आहे. भेंडीच्या बिजांनी एक स्वादिष्ट आणि पूर्णपणे कॅफीनमुक्त कॉफी तयार केली जाऊ शकते. भेंडीची कॉफी तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तसेच याचा व्यवसाय मोठा लाभ मिळवून देतो. यामुळे मागील काही काळापासून या कॉफीचा व्यवसाय अत्यंत वेगाने वाढतोय.
या कॉफीच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम भेंडीला पिकू दिले जाते, जेणेकरून त्याच्यातील बीज आणखी कठोर होऊ शकेल. पिकलेल्या भेंडीला सुकविले जाते, त्यातून बीज मिळविले जातात आणि चांगल्याप्रकारे धुवून पूर्णपणे सुकविण्यात येतात. सुकलेल्या बियाण्यांना भाजले जाते, त्यावेळी बिजांमधून कॉफीसारखा गंध येऊ लागतो आणि त्यांचा रंग करडा होत जातो. त्यानंतर त्यांची पावडर तयार केली जाते. तयार पावडरला उकळत्या पाण्यात टाकून स्ट्रीफ किंवा प्रेंच प्रेसमध्ये तयार केले जाते.
उत्कृष्ट स्वाद
भेंडीच्या कॉफीचा स्वाद खऱ्या कॉफीसारखा नसतो, परंतु यात नट्टी, टोस्टेड आणि अर्थी फ्लेवर येतो. ही कमी कडू असते, अनेक लोक यात दूध, साखर किंवा मसाले मिसळून पितात. काही लोक याला ओक्रा टी असेही म्हणतात. ही कॉफी नवी नाही. अमेरिकेच्या गृहयुद्धावेळी खरी कॉफी महाग आणि दुर्लभ झाल्यावर लोक ओक्रा सीड्स भाजून वापरू लागले होते. मेक्सिको, जाम्बिया आणि अनेक ठिकाणी आजही याला घरगुती स्तरावर तयार केले जाते.