Solapur News : सोलापूर बाजारात भेंडी–गवार महाग, पालेभाज्या स्वस्त
सोलापूर बाजारात गवार नऊ हजारांवर, कोथिंबीर स्वस्त
सोलापूर : बाजारात सध्या भेंडी, गवार, वांगी, कारली या भाज्या चांगलाच भाव खात आहेत. कोथिंबीर, टोमॅटो तसेच सर्व पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्या आहेत.
सध्या बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही भाज्या महाग तर काही भाज्या स्वस्त झाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून भेंडी, गवार, व बांगी या भाज्यांचे दर हे चांगलेच कडाडले आहेत. गवार सध्या नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यत पोहोचली आहे. तर कोथिंबीर, टोमॅटो तसेच सर्वच पालेभाज्यांचे दर हे खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच फळांमध्ये सफरचंद, बोर व पेरु, द्राक्ष या फळांची मोठी आवक होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनआलेले बाजारभाव किमान व कमालमध्ये पुढीलप्रमाणे :
कारली : १५०० ते ४५००, बांगी ७०० ते ३०००, कोबी ३०० ते ८००, ढोबळी मिरचीः ५०० ते ३५००, गाजर ६०० ते २१००, मिरची (लाल): ७०००ते २२०००, गवार ३५००ते ९०००, कोथिंबीर २०० ते ७००, काकडी ५०० ते २५००, प्लॉवर ५६० ते १२८०, लसून (सुका) : ५००० ते ११७००, मिरची (हिरवी) ३००० ते ४५००, भेंडी : १५०० ते ५०००, लिंबू : ३०० ते २०००, कांदा (लाल) : १०० ते २१२५, बटाटा : ६०० ते १३००, दोडका (शिराळी) : १००० ते ४०००, टोमॅटो : २००ते १०००, बीट : १५०० ते २००० पालेभाज्या शंभर जुडीचा भाव पालक : २०० ते ३००, शेपू : ५०० ते ७००, मेथी भाजीः २०० ते ५००, कांदा पात : ५०० ते ६००, चाकवत ४०० ते ६००, अंबाडी भाजी: ३०० ते ४००, तांदुळजा : ६०० ते ६००, मुळाशेंगा : २००० ते ३००० फळे क्विंटलचा भाव बोर १००० ते ५२००, चिकु : ६०० ते २०००, द्राक्ष लोकल : २००० ते ४८००, पेरु ५०० ते २२००, खरबुज ५०० ते २२००, डाळींब लोकल : ३००० ते २२५००, कलिंगड ३०० ते १५०० भुसार मालाचे भाव ज्वारी (मालदांडी) ३९०० ते ४३९५, तूर (लाल) ८०२५ ते ८११०, सोयाबीन ५६३५ ते ५६३५.