तेल कंपन्यांचे समभाग चमकले
06:10 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारतीय शेअर बाजारामध्ये बुधवारच्या सत्रात तेल कंपन्यांच्या समभाग दमदार तेजी दिसून आली. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे समभाग 5 टक्के इतके वाढलेले होते तर ओएनजीसीच्या समभागाने चार महिन्यानंतर उच्चांकी स्तरावर झेप घेतलेली पाहायला मिळाली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या समभागाने 52 आठवड्याच्या उच्चांवŠr स्तरावर पोहोचत 162 रुपयांवर 5 टक्के वाढीसह मजल मारली होती. या दरम्यान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन यांचे समभाग 2 टक्के इतके वाढले होते. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे समभाग सुद्धा 255 रुपयांवर 2 टक्के वाढीसह कार्यरत होते. गेलचे समभाग 4 टक्के वाढीसह 186 रुपयांवर कार्यरत होते याच दरम्यान ऑईल इंडियाचे समभाग दोन टक्के वाढत 421 रुपयांवर कार्यरत होते.
Advertisement
Advertisement