For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरे, येऊन येऊन येणार कोण?

12:00 PM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरे  येऊन येऊन येणार कोण
Advertisement

उत्तर गोव्यात पुर्वीच्या प्रचाराला उजाळा : श्रीपाद नाईक यांच्यासमोर खलपांचे आव्हान

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला आहे. माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि 25 वर्षे लोकसभेवर असलेले व अनेक वेळा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळलेले विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमोर आव्हान उभे झाले. एवढे दिवस मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष व त्यांची सारी टीम दक्षिण गोव्यात लक्ष केंद्रीत कऊन होती. उत्तर गोव्यात केवळ श्रीपाद नाईक हे एकटेच  आणि त्यांच्याबरोबर त्या त्या मतदारसंघातील आमदार प्रचारासाठी जात होते. मात्र अॅड. रमाकांत खलप यांची ‘एँट्री’ होताच उत्तर गोव्याचे भाजपचे चित्र हलू लागले.  खलपांएवढा तगडा नेता काँग्रेस पक्षाकडे अन्य कोणताही नव्हता. खलप यांच्याबरोबर आता काँग्रेसने मोठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. जाईल तिथे प्रचाराला सुऊवात होतेय ‘अरे येऊन येऊन येणार कोण? भाईशिवाय दुसरा कोण?’

पुर्वीच्या प्रचाराला उजाळा

Advertisement

या घटनेने विस्मृतीत गेलेले पूर्वीचे निवडणूक प्रचाराचे दिवस आठवले. अॅड. रमाकांत खलप हे जेव्हा मांद्रे मतदारसंघात प्रचाराला जात असत त्यावेळी कार्यकर्त्यांचा हाच नारा होता. आता तो पुन्हा सुऊ झाला. या एकाच आरोळीने इतर जनतेमध्ये एकप्रकारे भावनिक वातावरण तयार होतेय.

तुमच्या भावासाठी मत द्या

खलप यांनी गुऊवारी ईद-उल-फित्रची सुट्टी असल्याने त्याचा लाभ उठवून उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी प्रचाराला जाताना आपण ‘भाई’ या नावाने ओळखलो जातो. अर्थात तुम्हीच हे नाव ठेवलेले आहे. आपण आमच्या भगिनी आहात. भावासाठी आपण छोटासा परंतु महत्त्वाचा त्याग करा आणि आपले एक पवित्र मत मला द्या. अशा घरगुती व घरंदाज पातळीवर जाऊन मतदानाची अपेक्षा करणारे अॅड. खलप हे कार्यकर्त्यांना भारावून सोडतात.

‘भाऊ-भाई’ची लढत

केंद्रीय मंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांच्याबरोबरही जे कार्यकर्ते असतात ते त्या त्या भागातील आमदाराचे कार्यकर्ते असतात. अॅड. खलप हे ‘भाई’ तर श्रीपाद नाईक हे भाऊ! त्यामुळे ‘भाई आणि भाऊ’ची राजकीय लढत सध्या उत्तर गोव्यात गाजतेय. श्रीपाद नाईक यांच्या विरोधात कोणीही बलाढ्या उमेदवार नाही असा जो समज होता तो दूर झालेला आहे.

काँग्रेसकडे केवळ एक मतदारसंघ

काँग्रेसकडे उत्तर गोव्यात केवळ एक मतदारसंघ शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे हळदोणा. उत्तर गोव्यातील 20 पैकी 18 मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. तेथील आमदार भाजपचे आहेत. डिचोलीत अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये असले तरी ते सत्ताधारी भाजपबरोबर आहेत.

सांत आंद्रे, सांताव्रुज कोणाकडे?

आरजीचाही उमेदवार उत्तर गोव्यात असून या पक्षाकडे सांत आंद्रे हा मतदारसंघ आहे. सांत आंद्रे मतदारसंघ जास्तीत जास्त वेळा काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. यावेळी हा मतदारसंघ कोणाबरोबर राहील? सांताव्रुजचा आमदार काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विजयी होऊन भाजपमध्ये गेला तरी हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. यंदा काय होतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशा स्थितीमध्ये भाजप विऊद्ध काँग्रेस आणि ‘भाऊ विऊद्ध भाई’ असा संघर्ष सुरु आहे. त्यातच भाजपने प्रचाराची सारी यंत्रणा उत्तर गोव्यात कार्यरत केली आहे. उद्दिष्ट एकच दोन्ही मतदारसंघात भाजप विजयी झाला पाहिजे. उत्तर गोव्यात दोन्ही पक्षांचे नगारे वाजू लागले. गर्जना सुऊ झाल्या ‘येऊन येऊन येणार कोण?’ परंतु अजून थोडे वातावरण तापणे आवश्यक आहे. सध्या राज्यात उकाडा सुऊ झालेला आहे. त्यातच भर पडलीय राजकीय उकाड्याची.

Advertisement
Tags :

.