Kolhapur News | 'ओ मोदी बाहेर या, शिवसेनेचे नाव लावून स्वतःचे भागवू नका,; ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख आक्रमक नेमकं काय झालं?
सुनील मोदींच्या नगरसेवक नियुक्तीवर शिवसैनिक आक्रमक
कोल्हापूर- शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळायलं .... शिवसैनिक शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर शिवसैनिकांनी राडा घातल्याचे चित्र पाहायला मिळालं.
यावेळी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांनी शिवसैनिकांचा घात केला आहे अशा पद्धतीचा आरोप केला... आज सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत ठरलं होतं.... मात्र ऐनवेळी सुनील मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आलं... त्यामुळे नाराज झालेले शिवसैनिक शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर या गोष्टीचा निषेध केला. या प्रकरणामुळे ठाकरे शिवसेना गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळालं.