हृता दुर्गुळेचा नवा लुक चर्चेत
दोन वेण्या अन् मोठे कान
मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकांसोबत तिने चित्रपट, वेबसीरिज आणि नाटकांमध्येही स्वत:च्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री सध्या ‘अगं आई अहो आई’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. आता हृताने स्वत:च्या आगामी चित्रपटाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
हृताने आगामी चित्रपट ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती अभिनेता सारंग साठ्यो सोबत दिसत आहे. विशेष म्हणजे हृताचा लुक पाहून चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पोस्टरमध्ये हृता शाळेच्या गणवेशात असून तिच्या गळ्यात टाय, दोन वेण्या आणि चेहऱ्यावर निरागस हास्य दिसत आहे. तर सारंगच्या कानावर जास्वंदीचं फूल दिसून असून तो हृताचे कान धरताना दिसून येतो. पोस्टरचा हा मजेशीर अन् हटके अंदाज पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आली मोठी शहाणी हा चित्रपट 2 ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केले आहे. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्यो यांच्यासोबत चित्रपटात ऋजुता देशमुख, मैत्रयी दाते, सुहिता थत्ते, गुरु ठाकुर, विशाखा नाईक आणि प्रशांत कुलकर्णी यांचाही सहभाग आहे.