For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Crime | ओगलेवाडीच्या महिलेची कराडात लूट; भररस्त्यात ८ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढून चोरटा फरार

03:19 PM Apr 23, 2026 IST | NEETA POTDAR
karad crime    ओगलेवाडीच्या महिलेची कराडात लूट  भररस्त्यात ८ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढून चोरटा फरार
Advertisement

                 कराडमध्ये शिवजयंतीनंतर महिलेचे मंगळसूत्र लुटले

Advertisement

कराड: येथील पारंपारिक शिवजयंतीमिरवणूक पाहून घरी परतत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी २० रात्री उशिरा कराड शहरात घडली. याप्रकरणी मंगल दुष्यंत पांढरपट्टे (वय ५८, रा. हनुमान चौक, एम. एस. ई. बी. ओगलेवाडी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगल पांढरपट्टे या पती दुष्यंत पांढरपट्टे व मुलगा किशोर यांच्यासोबत कराडला शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी शहरात आल्या होत्या. दरम्यान मिरवणूक पाहून परतत असताना रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास कॉटेज हॉस्पिटल ते सिद्धीविनायक हॉस्पिटल दरम्यान निरामय हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. दरम्यान, फिर्यादीनुसार संशयित इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने अंगात चेक्सचा शर्ट परिधान केला होता.

Advertisement

अचानक आले अन् मंगळसूत्र हिसकावले

डोक्यावर टोपी घातलेला एक अनोळखी इसम समोरून येत होता. तो जवळ येताच त्याने अचानक महिलेच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून हिसकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला, घटनेनंतर महिलेचे पती दुष्यंत यांनी संशयिताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही. घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी घरी जाऊन चर्चा केल्यानंतर बुधवारी २१ एप्रिल कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,

Advertisement
Tags :

.