ऑफलाईन‘नास’ परीक्षा सुरळीत
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल सर्वे (नास) 2024 ही एन सी.ई.आर.टी. नवी दिल्ली आणि परख संस्थाकडून घेण्यात आलेली ऑफलाईन परीक्षा (चाचणी)सुरळीत पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील 128 शाळांमधील 3 हजार 254 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या चाचणीच्या निकालावरच जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरणार आहे. ही चाचणीची कामकाज 185 निरीक्षक आणि 185 छत्रिय अन्वेषकांनी पाहिले.
इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नास परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचे नियंत्रक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील जिल्हास्तरीय समन्वयक डॉ. वैशाली पाटील आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सुष्मिता मोहंती यांनी काम पाहिले. सकाळी 11 ते 1 परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी प्रश्नावली, शिक्षक प्रश्नावली आणि शाळा प्रश्नावली या भरून देण्यात आली. नास परीक्षा कॉफीमुक्त झाली. परीक्षा केंद्रांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीय एन. डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर , गटशिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी आणि विस्ताराधिकारी यांनी भेटी दिल्या.
कोल्हापुरातील विद्यार्थ्यांकडून जून महिन्यापासूनच नासा आधारित प्रश्नांचा सराव घेतला होता. शेवटच्या टप्प्यामध्ये नासाधारित दोन ऑनलाईन व एक ऑफलाइन चाचणी घेण्यात आली होती. भारतात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या चाचणीचा निकाल मार्च 2025 अखेर अपेक्षित आहे.