महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रिंगरोडच्या मार्किंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

09:22 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्वकल्पना न देता आलेल्या या अधिकाऱ्यांना बाचीमधील शेतकऱ्यांनी घेतले फैलावर

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बाची परिसरातून जाणाऱ्या रिंगरोड कामाचा प्रारंभ करण्यासाठी बाची गावामध्ये शुक्रवारी सकाळी संबंधित खात्याचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, कामगार असा मोठ्या संख्येने जय्यत तयारीने आलेल्या अधिकाऱ्यांना अखेर बाची गावातील शेतकऱ्यांनी हुसकावून लावले. तसेच या अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले आणी त्यांना जाब विचारत अखेर पळवून लावले. सध्या बेळगाव ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतीच्या कामात मग्न असून शेतीची कामे जोरदार सुरू आहेत. येथील शेतकरी रब्बी हंगामामध्ये गुंतला असताना शासकीय अधिकाऱ्यांनी वडगाव पोलीस स्टेशनच्या आधिकाऱ्यांसह या भागातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी कुणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता रिंगरोडचे मार्किंग गुप्तपणे सुरू केले होते. गेल्या दोन दिवसापासून या भागातील काही गावातून गुपचूप येऊन मार्किंगसाठी चुना, दगड, दोऱ्या व मशीन असे साहित्य घेऊन मार्किंग करण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी चालवला होता. मात्र शुक्रवारी सकाळी बाची गावातील शेतीमध्ये सदर प्रकार सुरू असताना याचा सुगावा ग्रामपंचायत सदस्य गुंडू गुंजकर, एल. आर. मासेकर, लक्ष्मण गुंजीकर, दत्तात्रय देवरमणी, सागर गुंजीकर, बसवंत देवरमनी, निळू कांबळे असे जवळपास 25 ते 30 शेतकऱ्यांना लागताच शेतकरी एकत्र येऊन गेले आणि या रिंगरोडसाठी मार्किंग व कामाला प्रारंभ करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालून अक्षरश: पळवून लावले.

बाची परिसरातील आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, तुरमुरी, बाची, कब्लेहोळ, सुळगा गावालगत असलेल्या शेतवडीतून सदर रिंगरोड कर्नाटक शासनाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सर्व्हेही करण्यात आला आहे. या रिंगरोडमध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना शासनामार्फत यापूर्वी नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या. सदर नोटिसीला उत्तर देण्यासाठी एप्रिल महिन्यात नोटीस बजावून अनेक गावांमध्ये येण्यासाठी कळवून देखील सदर अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. येथील शेतकऱ्यांनी शासकीय अधिकारी येणार म्हणून शेतीची कामे थांबवून वाट पाहत बसले होते. मात्र सदर शासकीय अधिकारी आलेच नाहीत. मात्र आता लपून-छपून पुन्हा मार्किंग करण्याचा आणि काम सुरू करण्याचा सपाटा चालवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी उचगावमध्येही अधिकाऱ्यांकडून सर्व्हेचा प्रयत्न

यापूर्वी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी जाऊन आपापल्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. असे असताना देखील सदर शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता पुन्हा या भागात मार्किंग करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. मागील दोन आठवड्यात उचगावमध्येही असाच प्रकार घडला. कुणालाही विश्वासात न घेता रिंगरोडसाठी अकस्मात मार्किंग सुरू करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी जाऊन या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article