महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राणेंच्या मताधिक्यासाठी महायुतीचे पदाधिकारी रणांगणात !

03:53 PM Apr 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी शहरात मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याच्या दृष्टीने भाजप शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागवार मतदारांशी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली , भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब ,सुधीर आडिवरेकर, ऍड . परिमल नाईक ,शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर ,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,सुरेंद्र बांदेकर आदींच्या उपस्थितीत शहरातील प्रचाराचा शुभारंभ सालईवाडा होळीचा खुंट , जुना बाजार आधी वार्डमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन करण्यात आला.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांमुळेच सावंतवाडी शहराचा विकासात्मक कायापालट झाला आहे. यापुढे हे शहर जगाच्या नकाशावर झळकणार आहे . या शहराचा सर्वांगीण विकास हेच दोन्ही नेते करू शकतात त्यामुळे विकास कामाला तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मताधिक्य देऊन केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा. या शहरातून जवळपास 90% हून अधिक मतदान माहितीचे उमेदवार नारायण राणे यांना प्राप्त करून दिले जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले . तर माजी आमदार राजन तेली ,माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी शहरात निश्चितपणे माहितीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संपूर्ण शहरवासीय साथ देतील आणि 90% हून अधिक मतदान निश्चितपणे होईल असा विश्वास व्यक्त केला . यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या आणि विकासात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, गुरुदास कामत, विशाल माने, बंटी पुरोहित, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत ,हेमंत बांदेकर ,सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, विश्वास घाग आदी महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisement
Tags :
#sawantwadi # narayan rane# loksabha # elections #
Next Article