आष्टा-वाळवा एमआयडीसीसाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पहाणी
आष्टा/वाळवा :
वाळवा, अहिरवाडी तसेच आष्टा वाळवा या रस्त्यावरती नियोजित एम. आय.डी.सी. प्रकल्प उभारणीसाठी एमआयडीसी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी जमिनीची पाहणी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही झाली.
उद्योग मंत्री उदय सामंत, खा. धैर्यशील माने, शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांची मुंबईत बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने मंत्री सामंत यांच्या आदेशानुसार शुक्रवारी गौरव नायकवडी, एम.आय.डी.सी. आर.ओ. ऑफीसर वसुंधरा जाधव, तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी पाहणी केली.
यावेळी दिलीप कुरणे, अमोल पडळकर, राहुल थोटे, डॉ. नंदकिशोर आटूगडे, योगेश नलावडे, गणेश माळी, पांडुरंग बसुगडे, सरपंच संदेश कांबळे, डॉ. राजेंद्र मुळीक, अहिरवाडी सरपंच बाळासो यादव, माजी उपसरपंच पोपट अहिर, उमेश घोरपडे, उमेश कानडे, वैभव खोत, राकेश आटूगडे, गणेश माळी, दिलीप कुरणे, प्रताप शिंदे, आदित्य अहिर, शुभम कोरे, शरद पवार, बंडा माने, सुमेध वायदंडे, सिद्धार्थ लोंढे, सर्कल, तलाठी उपस्थित होते. गौरव नायकवडी म्हणाले, ही एम.आय.डी. सी. गरजेची आहे, ती झाल्यानंतर संपूर्ण भागाचा विकास होणार आहे. सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे. नवीन उद्योजकांना त्यातून एक नवीन सुवर्णसंधी मिळणार आहे