कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आ . दीपक केसरकरांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पदाधिकारी नाराज

05:46 PM Dec 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष व पक्षाचे प्रमुख विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कमपणे मांडून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात शिवसेना पक्षाची वेगळी छाप पाडली . शिक्षण व मराठी भाषा मंत्री पदावर असताना आदर्श असे काम केले. मुंबई ,कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांचे पालकमंत्री म्हणूनही दर्जेदार काम केले . असे असताना त्यांना यावेळी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता तसेच कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्री केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायलाच हवे होते. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणच्या विकासासाठी केसरकरांची तळमळ पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केसरकर मंत्रिमंडळात असायलाच हवे होते असा सूर कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांमध्ये उमटत आहे. फडणवीस सरकारमध्ये 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा विजयी चौकार मारणारे शांत ,संयमी, हुशार, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले केसरकर यांना स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची कॅबिनेटमंत्री पदी वर्णी लागली आहे. त्याबद्दल सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचे अभिनंदनही केले आहे. मात्र , श्री राणे यांना मंत्रिपद मिळाले ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे. पण, त्याचबरोबर आमदार दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्यायला हवे होते जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे दोन्ही अभ्यासू आमदार कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला एक नवी झळाळी प्राप्त करून देण्यास सुलभ होणार होते अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. खरंतर श्री केसरकर यांनी शिवसेना पक्षाची भूमिका उत्कृष्टपणे बजावली आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रवक्ते म्हणून एक दर्जेदार काम केले. प्रवक्ता कसा असावा हे दाखवून दिले. शांत ,संयमी ,अभ्यासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून दर्जेदार काम केले आहे. 70 हजार शिक्षकांची महाभरती प्रक्रिया राबवली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र स्तरावर सातत्याने प्रयत्न केले. टप्पा अनुदान तसेच शिक्षण विभागात विविध उपक्रमही राबवले. राज्यातील शिक्षक संघटनांना एकत्र करून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केलेत. कोल्हापूर व मुंबई या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून आदर्शवत काम केले आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांच्याकडे अनेक संकल्पना आहेत. या संकल्पना सत्यात उतरण्यासाठी श्री केसरकर यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवे होते. अशी भूमिका त्यांनी मांडली आहे तर शिवसेनेचे जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी झळाळी येण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास गतीने होण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात घेणे आवश्यक होते. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास जगाच्या नकाशावर आणण्याच्या दृष्टीने केसरकर यांनी प्रयत्न केले त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संकल्पना आणि या भागाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे होते. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि त्यांच्या जोडीला जर केसरकर यांना संधी दिली असती तर सोन्याहून पिवळे झाले असते असे ते म्हणाले. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,तालुकाप्रमुख नारायण राणे,शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत कविटकर यांनी शांत ,संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले केसरकर यांना यावेळी मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी गेल्या पंधरा वर्षात एक विकासाच्या दृष्टीने चांगले काम केले आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास आणि कामे जलद गतीने होण्याच्या दृष्टीने त्यांना मंत्रिमंडळात असणे आवश्यक होते. असे त्यांनी स्पष्ट केले.. रत्न सिंधू योजना, चांदाबांदा योजनेचे काम आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. श्री केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना व महायुतीमध्ये नाराजीचा सूर आहे. नागपूर येथे रविवारी शपथविधी कार्यक्रम होता. मात्र त्यांनी नागपूर येथे न जाता नेहमीप्रमाणे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी ते रविवारी गेले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याबद्दल आपली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त केली. श्री केसरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. गेल्या वेळी फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून आपली छाप पाडली होती. त्यामुळे यावेळी फडणीस यांच्या या नव्या सरकारमध्ये केसरकर यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र ती फोल ठरली आहे. केसरकर यांना येत्या काळात महायुतीचे प्रमुख नेते कोणती जबाबदारी सोपवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांनी कोकण विकासाच्या दृष्टीने आपल्याला कोकणची जबाबदारी द्यावी असे म्हटले होते. त्यामुळे येत्या काळात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे श्री केसरकर यांचा अभ्यासू बाणा पाहता त्यांच्यावर पक्षाची अथवा अन्य सरकारमधील एका दुसरी मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # deepak kesarkar # sanju parab # ashok dalvi # rajan pokle
Next Article