For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार देण्याचा एकमुखी निर्णय

12:22 PM Oct 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार देण्याचा एकमुखी निर्णय
Advertisement

२७ ऑक्टोबरला अधिकृत घोषणा

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी एकत्रित निर्णय घेतला आहे. बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बांदा विविध कार्यकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित महत्वाच्या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ला, आणि दोडामार्ग तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. या बैठकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवाराची अधिकृत घोषणा होणार असून २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सदर बैठक सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Advertisement

. सुरेश गावडे यांनी प्रस्थावना केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. विलास सावंत यांनी शेतकरी संघटनांच्या सामूहिक शक्तीवर भर देत संघटनेचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. वेंगुर्ला  माजी सभापती . जयप्रकाश चमणकर यांनी   शेतकरी हितासाठी योग्य उमेदवार निवडण्याचे महत्व अधोरेखित केले. आभार प्रदर्शन श्री. संजय देसाई यांनी केले.
बैठकीस अनेक मान्यवर शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. दिवाकर म्हावंळणकर, रोनापालचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश गावडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक श्री. प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष  संजय देसाई, सचिव , अशोक सावंत, खजिनदार  आकाश नारसुले, प्रगत शेतकरी . प्रणव नाडकर्णी, प्रगत उद्योजक श्री. नारायण गावडे आणि श्री. चंद्रशेखर देसाई, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र अंदुर्लकर, सचिव श्री. हनुमंत गवंडी, सदस्य श्री. भानुदास गवंडी, श्री. शेखर नाईक, श्री. शरद आरोसकर, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय लाड, श्री. रत्नदीप धुरी, प्रगत आंबा-काजू बागायतदार संघटनेचे संशोधक श्री. विलास ठाकूर, यशस्वी सरपंच श्री. प्रकाश गाडेकर, जिल्हा नर्सरी संघटनेचे श्री. शिवराम आरोलकर, कामगार ठेकेदार श्री. समीर सावंत, प्रगत उद्योजक श्री. सुहास सावंत, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर परब, आणि लाकूड व्यापारी संघटनेचे सदस्य श्री. शिवाजी गवस आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या या निर्णायक निर्णयामुळे सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.