For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा
Advertisement

न्यायालयाकडून 2 लाख रुपयांचा दंड : एनडीपीएस प्रकरणी शिक्षा

Advertisement

वृत्तसंस्था /अहमदाबाद

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 1996 च्या एनडीपीएस प्रकरणी पालनपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा तसेच 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अमली पदार्थ जप्त करण्याशी संबंधित प्रकरणी ही शिक्षा झाली आहे. राजस्थानच्या एका वकीलाला खोट्या आरोपात गोवल्याप्रकरणी भट्ट हे दोषी ठरले आहेत. 1996 मध्ये पोलिसांनी पालनपूरच्या एका हॉटेलच्या खोलीमधून कथित स्वरुपात अमली पदार्थ जप्त पेले होते. त्यावेळी भट्ट हे बनासकांठा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अधीन असलेल्या जिल्हा पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेर सिंह राजपुरोहित यांना एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत अटक केली होती. राजपुरोहित यांना बनासकांठा पोलिसांनी राजस्थानच्या पाली येथील एक वादग्रस्त संपत्तीची मालकी हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचे तपासात आढळून आले होते. याचकरता पुरोहित यांना खोट्या आरोपात गोवण्यात आले होते. माजी पोलीस अधिकारी व्यास यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत 1999 मध्ये गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.