प्रमुख गॅस एजन्सीमध्ये अधिकारी नियुक्त
06:12 AM Mar 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ पणजी
Advertisement
राज्यातील एलपीजी पुरवठा आणि वितरणाबाबत चिंता व्यक्त होत असताना, नागरी पुरवठा खात्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी राज्यात 53 गॅस एजन्सींवर अधिकारी नियुक्त केले आहेत.
केंद्र सरकारने 1955च्या अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तरतुदी लागू केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरी पुरवठा खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार, कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच अनियमितता टाळण्यासाठी व साठेबाजीविरहित वितरण सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करण्यासाठी सदर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी वेगवेगळ्या एलपीजी एजन्सींमध्ये तैनात असतील. पुरवठा साखळीवर बारकाईने देखरेख ठेवणार आहेत. ग्राहकांना विनाव्यत्यय सेवा उपलब्ध करणे या नियुक्तीमागील उद्दिष्ट आहे.
Advertisement
Advertisement