For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्यालय ते पाणी ते घर

06:06 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार्यालय ते पाणी ते घर
Advertisement

केवळ महानगरांमध्येच नव्हे, तर लहान नगरांमध्येही अलिकडे वाहनांची संख्या इतकी वाढली आहे, की टॅफिक जॅमची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे आपण प्रतिदिन करत असलेला घर ते कार्यालय ते पुन्हा घर हा प्रवासही रहदारीमुळे नकोसा वाटतो. अशी स्थिती प्रगत देशांमध्येही असते. मात्र स्विट्झरर्लंड या देशातील काही कर्मचाऱ्यांनी रहदारी आणि तिच्यामुळे हाणारी दगदग टाळण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. या कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी विशिष्ट भागातून या कार्यालयात येतात. त्यांची घरे आणि कार्यालय यांच्यात एक नदी आहे. हे कर्मचारी काम संपल्यानंतर कार्यालयातून परत घरी जाताना सार्वजनिक वाहनांचा उपयोग करत नाहीत. त्याऐवजी ते गर्दीचा आणि हरदारीचा त्रास टाळण्यासाठी सरळ अंगावरचे कपडे काढून या नदीत उडी घेतात आणि पोहत आपल्या घरांकडे जातात. नंतर घरी जाऊन कपडे बदलतात.

Advertisement

पोहत जाताना काढलेले कपडे भिजू नयेत, म्हणून त्यांनी वॉटरप्रूफ बॅग्ज बनवून घेतल्या आहेत. या जलप्रवासासाठी ते प्रतिदिन घरातूनच सज्ज होऊन येतात. घरातून येताना ते सार्वजनिक वाहनांमधून येतात. मात्र, परत जाताना नदीतून पोहत जातात. यामुळे त्यांचा तिहेरी लाभ होतो. एक, तर घरी जाताना हरदारी, गर्दी आणि दगदग टाळता येते. पोहण्यासाठी काही खर्च येत नसल्याने पैसेही वाचतात. तसेच प्रतिदिन पोहणे केल्यामुळे अनायसे व्यायामही घडतो. अशा प्रकारे त्यांनी शोधलेला हा पोहण्याचा उपाय अतिशय प्रभावशाली ठरला आहे. हे सर्व कर्मचारी कार्यालयातून एकाचवेळी बाहेर पडत असल्याने त्यांना पोहताना एकमेकांची सोबत आणि सहकार्यही मिळते. त्यामुळे त्यांचा हा कार्यालयातून परतीचा प्रवास आनंददायी ठरतो, अशी या कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. अर्थात, हा उपाय सर्वांना करता येणार नाही. कशी स्थिती प्रत्येकाला मिळणे अशक्य आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.