For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rain Prayer | मृग नक्षत्र संपलं तरी पाऊस गायब! 'या' गावाने जलसंकट दूर करण्यासाठी देवाला साकडे

05:15 PM Jun 26, 2026 IST | NEETA POTDAR
rain prayer   मृग नक्षत्र संपलं तरी पाऊस गायब   या  गावाने जलसंकट दूर करण्यासाठी देवाला साकडे
Advertisement

म्हाकवे - मृग नक्षत्र संपूनही पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक चिंतेत ग्रासले आहेत. पेरण्या खोळंबल्या असून धरणीमाता पावसाची वाट पाहत आहे. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि जलसंकट दूर व्हावे यासाठी म्हाकवे येथील समस्त भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक केला.

Advertisement

हे देवा, वरुण राजाला प्रसन्न कर आणि लवकरात लवकर म्हाकवे परिसरासह संपूर्ण सृष्टी सुजलाम् सुफलाम् कर," असे साकडे यावेळी उपस्थित अबालवृद्धांनी देवाच्या चरणी घातले.

पारंपरिक श्रद्धेचा जागर
ग्रामीण भागात जेव्हा पाऊस लांबतो, तेव्हा गावाला दुष्काळाच्या छायेतून वाचवण्यासाठी देवाला पाणी घालण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत आज म्हाकवे गावातील प्रमुख मंदिरांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत जलाभिषेक केला. देवाला गारवा मिळाला की निसर्गातही गारवा निर्माण होतो आणि पाऊस पडतो, अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.

Advertisement

​सध्या म्हाकवे परिसरात या धार्मिक अनुष्ठानाची आणि वरुण राजाला घातलेल्या साकड्याची जोरदार चर्चा सुरू असून, आता सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेतयावेळी सुमारे 25 तरुण आणि देवांना अभिषेक घालण्यासाठी वेदगंगा नदीतून पाण्याच्या घरी भरून आणल्या व त्याचा गावातील सर्व देवांना अभिषेक घातला यावेळी गावातील समस्त वालंग मंडळ व भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.