यल्लम्मा देवीला साडेचार लाख रुपये किमतीची साडी अर्पण
वार्ताहर/बाळेकुंद्री
विजयपूर जिल्ह्यातील जंबगी येथील प्रभूदेवरा बेट्ट येथील शिवयोगीश्वर महाराज यांच्या इच्छेनुसार रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा तालुक्यातील वीरघट्टचे अडवीलिंग महाराज यांनी सुमारे साडेचार लाखाहून अधिक किमतीची साडी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीला शुक्रवारी अर्पण केली. 1955 मध्ये जंबगी येथील प्रभूदेवरा बेट्टचे शिवयोगेश्वर महाराज हे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी देवीला साडी देण्याचा विचार व्यक्त केला होता. आता 70 वर्षानंतर त्यांनी काशी बनारस येथील रेशीम साडी आणून देवीला समर्पित केले. व त्यांनी सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी देवीकडे प्रार्थना केली. यावेळी रायचूर, विजयपूर आणि बळळारी जिल्ह्यातील शेकडो कलाकारांनी सलग तीन दिवस भजन सादर केले. यावेळी विरपट्टदचे अडवीलिंग महाराज, विवेक चिंतामणी बाबूरायगौडा बिरादार, सी. एन. कुलकर्णी, अल्लमप्रभूचे पंडित यडूरया आदी मान्यवर उपस्थित होते.