For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण

12:24 PM Apr 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण
Advertisement

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर मुकुट

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

मालवण शहर धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा 71 वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनः प्रतिष्ठापना 4 वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन सोहळा औचित्य साधून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वतीने नव्या झळाळीसह देण्यात आलेला सुवर्ण मुकुट मंगळवार 31 मार्च रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर अर्पण करण्यात आला.श्रीकृष्ण मंदिरात पूर्वी असलेल्या मूर्तीला खासदार नारायण राणे यांनी सुवर्ण मुकुट अर्पण केला होता. गेल्या काही वर्षात मंदिरात नव्या स्वरूपात मोठ्या श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे मूर्तीचा सुवर्ण मुकुट राणे साहेबांच्या प्रेरणेतुन मोठया स्वरूपात तयार करण्यात आला. खासदार नारायण राणे साहेब यांचा 10 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकृष्ण मूर्तीवर हा नवा मुकुट दत्ता सामंत यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिर अध्यक्ष वसंत गांवकर, मुंबई अध्यक्ष अरुण कासवकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अंकित नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मोहन वराडकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, भाऊ चव्हाण, किसन मांजरेकर, शेखर गाड, अखिलेश शिंदे, सुशील शेडगे, गणेश परब, भाई कासवकर यांसह आनंद जामसंडेकर, तुळशीदास गांवकर, किशोर वेंगुर्लेकर, दत्ता केळूसकर, बाबू धुरी, दिपक धुरी, गणपत तांडेल, शंकर शिर्सेकर, आबा शिर्सेकर, रवी कासवकर, नामदेव सारंग, शिवाजी केळूसकर यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण मूर्तीची पूजा अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.