महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आप’ आमदारांना 25 कोटींची ‘ऑफर’

06:11 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून सरकार पाडण्याचा डाव : अरविंद केजरीवाल यांचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपकडून दिल्लीतील आप सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे (आप) 7 आमदार विकत घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. ‘आप’च्या आमदारांना पक्ष सोडण्यासाठी 25 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्याबरोबरच दिल्ली सरकारमधील अर्थमंत्री आतिशी यांनीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर अनेक आरोप केले आहेत.

गेल्या काही दिवसांत भाजपने दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या 7 आमदारांशी संपर्क साधल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. त्यांना मोठे आर्थिक आमिष दाखविण्यात आले असले तरी त्यांनी पक्ष सोडण्यास नकार दिल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. जिथे भाजपचा पराभव होतो, तिथली सरकारे पाडण्यात ते सतत व्यग्र असतात असे सांगतानाच आमच्या सरकारने दिल्लीतील जनतेसाठी किती काम केले हे भाजपवाल्यांना माहीत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केल्याचेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article